शिटी आयडियाज ट्रेंडिंग : रिअल लाईफ घटनांवर वेब सीरीज

    09-Sep-2019यूट्यूबवरचं प्रसिद्ध चॅनल शिटी आयडियाज ट्रेंडिंग हे त्याच्या फनी वेबसीरीज साठी प्रसिद्ध आहे. अनेक कपल्स आवर्जून या वेब सीरीज फॉले करतात. मात्र या चॅनलची खासियत अशी कि ही वेबसीरीज कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरुन आपली स्क्रिप्ट लिहीते. म्हणजे एसआयटीची फाऊंडर आणि लीड एक्टर छवि मित्तल हुसैन ही गरोदर असताना वेब सीरीजची थीम लाईन प्रेग्नंसी होती, आणि आता तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना त्यावर एसआयटीचा लेटेस्ट एपिसोड आला आहे.
 

 
द बेटर हाफ अशी ही वेब सीरीज आहे, आणि यामध्ये रिशी आणि रोहिणी या कपलच्या आयुष्यात घडणाऱ्या मजेदार घटना दाखवण्यात आल्या आहेत. मग ते महाबळेश्वर ट्रिप असू देत, दिवाळी किंवा करवाचौथ स्पेशल असू देत किंवा आता प्रेग्नेंसी आणि लहान बाळ असू देत. गंमत म्हणजे यामध्ये लहान बाळाच्या भूमिकेत छवि हिचंच दोन महिन्यांचं बाळ ‘अर्हम’ आहे. त्यामुळे अगदी खऱ्या आयुष्याच्या खऱ्या घटनांवर आधारित अशी ही वेब सीरीज आहे.
 

 
याशिवाय शिटी आयडियाजवर आता एक नवीन वेब सीरीज ‘यूअर्स क्यूपिडली’ देखील सुरु होणार आहे. एसआयटीचे फॅन्स या वेब सीरीजची आतुरतेने वाट बघतायेत. एसआयटीचीच आणखी एक शाखा म्हणजेच आणखी एक चॅनल विटी आयडियाज ट्रेंडिंग सुरु होतंय, आणि त्यावरच ही वेब सीरीज येणार आहे. Lets see what is on the plate.. Waiting for it.. :)