सोनाली बेंद्रेच्या हातचे उकडीचे मोदक खाल्ले का?

    04-Sep-2019


 

गेल्या काही दिवसांपासून सोनाली बेंद्रे चर्चेत होती. आधई तिच्या कर्करोगामुळे त्यानंतर तिने ज्या पद्धतीने स्वत:ला यातून बाहेर काढले त्यामुळे. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ते म्हणजे तिच्या हाताच्या उकडीच्या मोदकांमुळे. सगळ्याच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यांचा आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक देखील त्यांच्यासाठी हजर आहेत. सोनाली बेंद्रेने देखील स्वत:च्या हातानी केलेले उकडीचे मोदक बाप्पा समोर प्रसाद म्हणून ठेवले आहेत. इंस्टाग्राम वरुन “गणपती बाप्पा मोरया, चला उकडीचे मोदक करुयात.” असं सागंणारी पोस्ट केली आहे. आणि एकूणच तिच्या चाहत्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. 
 
 

या वर्षी अधिकांश कलाकारांच्या घरी ‘इको फ्रेंडली’ सजावट करण्यात आली आहे. तसेच सोनाली हिच्या घरी देखील पर्यावरण पूरक गणेश स्थापना करण्यात आली आहे. गणपतीची आरास पर्यावरणाला ध्यानात ठेवून करण्यात आली आहे. “ मला आनंद आहे की या वर्षी मी घरी परत आले आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी, अधिक स्वस्थ होऊन आणि आणखी स्ट्रॉंग होऊन. मला माझ्या बाप्पावर पूर्ण विश्वास आहे. देवासोबत आपला संवाद खूप महत्वाचा असतो, त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनावर अधिक होतो. आपण हे जपलं पाहीजे.” असा संदेश देणारी पोस्ट तिने केली आहे. 
 
 
 
 

सोनाली बेंद्रे हिला गेल्या वर्षी कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तिचे फोटोज बघून तिच्या चाहत्यांनी तिच्या उत्तम प्रकृती साठी प्रार्थना देखील केली होती. अखेर ती कर्करोगावर मात करत पुन्हा एकदा बाप्पाच्या आगमनासाठी स्वत:च्या घरी परतली आहे, यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.