गल्लीबॉय ने मारली ‘ऑस्कर’ मध्ये धडक

    22-Sep-2019


 
 आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिवुडने भारताचा मान वाढविण्याचा ध्यास घेतला आहे. ‘मेरी गली में गली गली गली में’ म्हणत रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या प्रसिद्ध चित्रपट ‘गल्ली बॉय’ ला ९२ व्या ऑस्कर अवॉर्ड्स मध्ये नामांकन मिळाले आहे, आणि याबद्दल सगळ्यांना खूप खूप आंनंद होत आहे. अतिशय हलाकीच्या परिस्थितीत वाढणाऱ्या एका ‘रॅपर’ची ही स्टोरी आता इंटरनॅशनली प्रसिद्ध झाली असून जगातल्या सगळ्यात ‘भारी’ अशा या ‘ऑस्कर अवॉर्ड्स’ मध्ये नामांकन मिळणे म्हणजे आपल्या सर्वांसाठीच अतिशय अतिशय अभिमानाची बाब आहे.
 
 
 

 
इंडियन फिल्म फ्रेडरेशनने ही माहिती दिली असून पुढल्यावर्षी फेब्रुवारी महीन्यात ऑस्कर अवॉर्ड्स वितरण सोहळा होणार आहे. अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या सोहळ्यात भारताला नामांकन मिळणे ही अतिशय गौरवास्पद बाब आहे. 
 
 
 

जोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला गली बॉय चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तसंच, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. गली बॉय चित्रपटाला या आधी मेलबर्न येथील भारतीय फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या नावाची निवड प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. या रेसमध्ये गली बॉयसह 'उरी द सर्जिकल स्ट्राइक', 'केसरी', 'बधाई हो', 'आर्टिकल १५' आणि 'अंधाधून' हे चित्रपट होते. या सर्व चित्रपटांवर मात करत गली बॉय चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.