नुकतीच मराठी बिगबॉस मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे चित्रपटाच्या टीझरमध्ये पावसाच्या प्रत्येक थेंबाला स्वतःच एक गाणं असतं असं सांगत, ते ऐकत पावसात चिंब भिजताना आपल्या दिसते. शिवाय फोनवर ती अंकुश बरोबर गप्पा मारताना खळखळून हसताना दिसते. तर त्याचवेळी अभिनेत्री पल्लवी पाटील अंकुशाचा हात पकडताना दिसते यामुळे ‘ट्रिपल सीट’ मध्ये नक्की काय ट्वीस्ट आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा वाढली आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत.
नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत. तगडी स्टारकास्ट आणि अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.