आलियाची अफ्रीकन जंगल सफारी बघितली का?

    20-Sep-2019



 
 
 
खरं तर हे सेलेब्स जिथेही जातात त्यांचे फोटोज, व्हिडियोज काही मिनिटांमध्ये व्हायरल होतात. मात्र आलिया भट्ट हिचे स्वत:चे यूट्यूब चॅनल आहे, आणि त्यावर ती अनेक व्हीडीयो लॉग्स टाकत असते. तर अशाच अनेक व्हिडियो लॉग्स म्हणजेच व्ह्लॉग्स पैकी एक तिचा लेटेस्ट अफ्रीकेच्या जंगल सफारीचा व्ह्लॉग आहे, आणि या व्हिडियो ला बघून आपणही जंगल सफारीला लगेच जावं, असं वाटल्या वाचून राहत नाही.
 
 
 

यामध्ये आपल्याला आलिया जंगलातील अनेक प्राणी जसे की तरस, झेब्रा आदि तर दाखवतेच पण त्यासोबतच ती राहत असलेल्या टेंट्स ची मजा देखील बघायला मिळते. ती तेथील स्टाफ ला हिंदी शिकवताना आणि स्वत: आफ्रीकेची भाषा ‘स्वाहिली’ शिकताना देखील दिसते. बरं स्वाहिली मध्ये थँक यू किंवा धन्यवादला ‘असांटे’ असं म्हणतात हे तुम्हाला माहीत होतं का? तर असे अनेक शब्द ती शकते आणि तेथील लोकांना नमस्ते, शुक्रिया आणि ब्रम्हास्त्र असे शब्दही शिकवते. 
 
 
 

ती तिचा जंगल सफारीचा अनुभव शेअर करतेय, सोबतच टेक्नोलॉजी पासून, स्वत:च्या फोन पासून काही काळ लांब राहिल्यावर, निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यावर किती छान वाटतं, किती निवांत वाटतं, असं देखील ती सांगते. त्यामुळे असे व्हिडियोज आवडणाऱ्यांनी, जंगल सफारी मध्ये विशेष रस असणाऱ्यांनी आणि एकूणच ट्रॅव्हल फ्रीक लोकांनी तर आलिया भट्टचा हा व्हीडियो लॉग नक्कीच बघावा.