आणि.. शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठी २ चा विजेता

    02-Sep-2019 
अतिशय उत्कंठावर्धक, बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठी - २ च्या विजेत्याचे नाव आज जाहीर झाले आहे. अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे बिग बॉस मराठी सीझन २ जिंकला असून नेहा शितोळे हिला मात देत त्याने बाजी मारली. बिग बॉसच्या या पर्वाचा विजेता कोण होतं याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. टॉप ५ मध्ये किशोरी शहाणे, वीणा जगताप, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे आणि नेहा शितोळे होते, मात्र अखेर नेहा आणि शिव यांनी अखेरच्या दोन लोकांमध्ये आपले नाव नोंदवले. प्रेक्षकांच्या भरघोस मतांमुळे शिव ठाकरे बिग बॉसच्या या पर्वाचा विजेता ठरला. 
 
 
 

 
मूळचा अमरावतीचा असलेला शिव या आधी ‘रोडीज’ या बहुचर्चित हिंदी रिअॅलिटी शओ मध्ये दिसला होता. त्यानंतर बिग बॉसमुळे त्याला नवीन ओळख मिळाली. आणि अखेर विजयी होऊन त्याने एका नव्या विश्वात पाऊल ठेवले आहे. यापुढे तो आणखी कुठल्या कार्यक्रमांमध्ये, मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये दिसेल याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 
 

 

शिवचा प्रवास सुरुवातीपासूनच रंजक ठरला. शिव आणि वीणा ची जोडी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची हिट जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. शेवटी शिव आणि वीणाच उरणार का? असा देखील प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला होता. प्रेक्षकांच्या पसंतीस उसतरून शिवने हे यश मिळवलं. आता पुढे तो आणखी कुठल्या कार्यक्रमात दिसेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.