रे आणि निखत… भन्नाट जोडी..ही नावं ऐकल्यावर काही ओळखीचं वाटलं. Obviously वाटणारच कारण I am sure अडल्टिंगचे दोन्ही सीझन्स तुमचे बघून झाले असतील. ज्यांनी नसतील बघितले त्यांनी ते लगेचच बघा. मला जाम आवडलेली अमेझिंग अशी ही वेब सीरीज आहे. Bro you must watch it kind of. 

तर मला रे आणि निखत मधल्या सागळ्यात जास्त आवडलेल्या काही गोष्टी सांगतेच पण त्याआधी रे निखत कोण हे ज्यांना माहीती नाही, त्यांना ती माहिती ही देते. रे आणि निखत या दोन रूम मेट्स, नुकत्याच जॉब लागलेल्या Adulting च्या दुनियेत नुकत्याच पाऊल ठेवलेल्या दोन घट्ट मैत्रीणी. रे काहीशी Immature आणि निखत थोडी इमोशनल, थोडी प्रॅक्टिकल. पण एकूणच दोघींना बघून दोघीही आपल्याशा वाटणाऱ्या. तर अशा या रे आणि निखत सगळ्यांना आवडतात तर का? 

रे चा इनोसंस : ‘अडल्टिंग’ या वेब सीरीज मधली रे खूपच इनोसंट तरीही रॉकिंग अशी आहे. दिसायला पण एव्हढुशी दिसणारी यशस्विनी दायमा म्हणजेच रे तिच्या डॉयलॉग्समुळे जास्त लक्षात राहते. महिना अखेर असताना निखतचा वाढदिवस साजरा करण्याचा तिचा प्रयत्न, सीझन टू मध्ये निखत आता आपल्याला सोडून दुसरीकडे जाणार हे माहिती झाल्यावर तिची रिएक्शन, तिचे रॅप्स, हे सगळंच खूप ‘क्यूट’ असं वाटतं. 

निखतची डायलॉग डिलिव्हरी : निखतची म्हणजेच आयशा अहमद हिची डायलॉग डिलिव्हरी खूपच भारी आहे. एकतर ती दिसायला गोड, त्यातून तिचा अभिनय आणि तिची डायलॉग डिलिव्हरी खूपच भारी अशी आहे. रे आणि निखतची जोडी आजच्या यंगस्टर्सना नक्कीच रिप्रेझेंट करते. तिच्या सर्व संवादातून हे सर्व नक्की दिसून येतं. 


 
कूल लाईफस्टाइल पण जबाबदारीची असते : दोघीच मुली इंडीपेंडेंट राहतायेत, कमवतायेत, फिरतायेत, पार्टी करतायेत, मात्र ही कूल लाईफस्टाइल पण जबाबदारीची असते, हे पण यातून दिसलं आहे. म्हणजे सीझन टूच्या एका एपिसोडमध्ये रे ला एरिअर्स मिळतात, आणि ती तिचे पैसे खर्च करुन टाकते, मात्र त्यानंतर निखत तिची क्लास घेते चांगलीच. एकूणच अडल्टिंगचे खरे प्रॉब्लेम्स आणि त्यावरचे खरे सॉल्युशन्स या वेब सीरीझमध्ये दाखवण्यात आले आहेत. 

डायरेक्शन उत्तम : या वेब सीरीझचं दिग्दर्शन उत्तम आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यूथला काय हवंय हा विचार करुन हे दिग्दर्शन करण्यात आलं आहे. दिग्दर्शिका जेसिका सदाना हिने खूप विचार करुन उगीचच कूल वाटावं असं काही न करता, छान सोप्पी अशी ही वेब सीरीज आहे. दुसऱ्या सीझनमध्ये अंकिता शर्मा हिने देखील छान दिग्दर्शन केले आहे. 

रे निखत तुमच्या आमच्या आहेत, त्या खूप आपल्या वाटतात कारण त्यांच्या परिस्थितीला आपण रिलेट करु शकतो. त्यांचं ऑफिस, त्यांचे मित्र, त्यांचे शेजारी, त्यांच्या सोबत घडणाऱ्या घटना या सगळ्या आपल्या वाटतात. 

जे कुणी असे फ्लॅटमध्ये रूममेट्स सोबत राहत असतील, इंडिपेंडंट होण्याच्या प्रयत्नात असतील, रेंट देणे, बाहेर फिरायला जाणे, ओनर ला डील करणे अशा अनेक डगरींवर जे हात ठेवत या अडल्टिंगला समझण्याचा प्रयत्न करतायेत, त्यांना ही वेब सीरीझ नक्कीच फील होईल. 


कास्ट : रे : यशस्विनी दायमा
           निखत : आयेशा अहमद

रिव्ह्यू स्टार्स : 4/5