तू चाल पुढं तुला रे गड्या भिती कुणाची

    11-Sep-2019


 

 

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. कुंकू सिनेमातलं हे गाणं अजरामर आहे. या गाण्याचे बोल नुसते गुणगुणायला जरी लागले तरी अंगावर काटा येतो व कितीही खचलेला माणूस असला तरी तो पुन्हा आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहतो.

सद्यस्थितीला अशीच काहीशी अत्यंतिक गरज महाराष्ट्रातील तुमचे आमचे बंधू भगिनी असणाऱ्या पुरग्रस्तांना आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कोणाच्या ध्यानी मनी नसताना निसर्गाने रौद्ररूप धारण केलं व तो महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व कऱ्हाड या जिल्ह्यांमध्ये असा काही बरसला की ज्या मुळे अगदी शब्दशः 'होत्याचं नव्हतं' झालं. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, व्यवसाय पाण्याने वाहून, निष्पाप जनावरांचे बळी गेले, लाखो लोकांचे वैयक्तिक आयुष्य मोडकळीस आले.

पूरग्रस्त भागातील अनेक तरुणांचे व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. अनेकांची नवीन लग्न झालेली होती, त्यांचे संसार मोडकळीला आले आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानाची आपण कल्पना देखील करु शकत नाही.

पूर कमी झाल्यावर समाजातील चारी बाजूने पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ वाहू लागला. सरकार, प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था या सगळ्यांनी तर सर्वतोपरी सहाय्य करण्याचे कार्य अहोरात्र चालू ठेवले. कोल्हापूर, सांगली व कऱ्हाड येथील जनजीवन आता थोड्या बहुत प्रमाणात पूर्वपदावर येऊ लागले आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे.

 
 
 

पण आता खरी गरज आहे तेथील पूरग्रस्त नागरिकांचे संसार व्यवसाय मूळ पदावर आणण्याची. पुरामध्ये जे काही वाहून गेलं आहे ते सगळंच आता सुरु असणाऱ्या मदतकार्यातून त्यांना परत मिळणे शक्य नाही. (याचा अर्थ असा मुळीच नाही की होत असलेले मदत कार्य चुकीचे आहे.) आता मिळत असलेल्या आर्थिक वा वस्तू स्वरूपातील असो, मदतीतून पूरग्रस्तांची पुढील काही दिवसांची तरतूद होईल;पण त्यांचा वाहून गेलेला संसार पूर्ववत करण्यासाठी, उध्वस्त झालेले व्यवसाय नव्या जोमाने सुरु करण्यासाठी तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी थोड्या प्रमाणात का होईना पण अर्थ सहाय्य उपलब्ध असणे ही आजचे गरज आहे.

सामाजिक बांधिलकी जपत आपले व्यवसाय करणाऱ्या अनेक संस्था आज आपल्या इथे कार्यरत आहेत. बदललेल्या परिभाषेत सांगायचं झाल्यास अशा उपक्रमांना आपल्या येथे 'सीएसआर' ह्या नावाने संबोधलं जातं. अनेक कंपन्या सीएसआर एक्टिव्हिटीजच्या माध्यामातून पूरग्रस्त भागांमधील या तरुणांची, व्यावसायिकांची मदत करत आहेत.

उदाहरणार्थ पुण्याच्या जनता सहकारी बँकेने या परिभाषेत आपले वेगळेपण गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित ठेवले आहे. व्यवसाय करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रमातून बँकेने जनमानसात आपली प्रतिमा उंचावली आहे व आपला ठसा उमटविला.

आता याच सामाजिक बांधिलकीचे पुढचे पाऊल म्हणून जनता सहकारी बँकेने पूरग्रस्तांसाठी विशेष अशी 'जन आधार व्यक्तिशः कर्ज योजना' सुरु केली आहे. बँकेच्या विद्यमान वैयक्तिक कर्ज योजनेपेक्षा हि योजना वेगळी असून पुरग्रस्तांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन व त्या लवकरात लवकर निवारल्या जाव्यात यासाठी कमीत कमी अटींसह ही योजना बँकेने तयार केली आहे. कोल्हापूर, सांगली व कऱ्हाड या शहरांमध्ये पुरामुळे अडचणीत आलेल्या कोणताही नोकरदार अथवा व्यावसायिक वैयक्तिक रित्या या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतो.

आज मदतीचा ओघ प्रचंड आहे, उद्या कदाचित तो वाढेल पण हा ओघ कधी ना कधी थांबणार आहे. त्यामुळे दूरदृष्टीचा विचार करून आत्ताच पुरग्रस्तांचे जीवन सुरळीत करण्याच्या प्रमुख उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली आहे. शांताराम आठवले यांनी लिहिल्याप्रमाणे या आपल्या तमाम पूरग्रस्त बंधू-भगिनींना 'तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची' असं फक्त कोणीतरी विश्वासाने म्हणण्याची गरज आहे आणि तो आर्थिक विश्वास आपली जनता बँक,पुणे देत आहे. पुरात वाहून गेलेला संसार पुन्हा पूर्ववत व्हावा, पुन्हा दैनंदिन व्यवसाय सुरळीत सुरु व्हावेत याच दृष्टिकोनातून ही योजना सुरु झाली आहे.

या योजनेची वैशिष्ट्य :

ही योजना विशेष उद्देशाने व विशेष नागरिकांकरिता तयार केली असल्याने इतर योजनांपेक्षा याचे वेगळेपण नक्कीच दिसून येईल. या योजनेअंतर्गत व्यक्तिशः नोकरदारवर्गाला त्वरित रु.दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तर हिच रक्कम मर्यादा व्यक्तिगत व्यावसायिकांसाठी वाढवून रु.पाच लाख रुपये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा व्याजदर देखील कमी ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे वैयक्तिक कर्ज योजनेसाठी जनता बँकेत सध्या १४.१५% व्याजदर सर्वत्र चालू आहे, पण ही विशेष योजना असल्याने विद्यमान खातेदारासाठी केवळ १० % व नवीन खातेदारासाठी ११% व्याजदर आकारला जाईल. कर्ज घेतल्यावर लगेचच पुढच्या महिन्यापासून पूरग्रस्तांना हप्ते भरणं शक्य होणार नाही म्हणून त्याचाही विशेष विचार करून पहिले सहा महिने प्रत्येक कर्जदाराला ड्राय पिरिअड दिला जाणार आहे. या सहा महिन्यात त्यांना फक्त कर्ज रकमेवरील व्याजाचीच रक्कम भरावी लागेल. आकडेमोड करावयाची झाल्यास रु. दोन लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास पहिले सहा महिने केवळ रु.१६६७ रुपये व्याजापोटी भरावे लागतील. त्याचबरोबर या कर्ज योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. तसेच कोणत्याही जोडतारणाशिवाय हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शाळा, कॉलेज, येथील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कंपनी कामगार किंवा इतर संस्थांमधील नोकरदार व ज्याची पुरामुळे सांपत्तीक/मालमत्ता हानी झाली आहे या सगळ्यांना हे कर्ज मिळू शकते. व्यवसायाचे आवश्यक परवाने असणाऱ्या व्यक्ती, फर्म किंवा कंपनी ज्यांची पुरामुळे सांपत्तीक/मालमत्ता हानी झाली आहे यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. व्यावसायिकांसाठी रु.५ ते १० लाख रुपयांची तारणी कर्ज मर्यादा देखील उपलब्ध आहे. जनता सहकारी बँकेचे विद्यमान व्यावसायिक खातेदार असणाऱ्यांना तर हे कर्ज मिळेलच पण त्याखेरीज नवीन खातेदार सुद्धा या कर्ज योजनेचा लाभ घेऊन नव्याने आपले व्यवसाय उभारू शकतील. ही योजना कोल्हापूर, सांगली व कऱ्हाड या शहरांपुरतीच मर्यादित आहे, जिल्हापातळीवरील नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही.

'जन आधार' या विशेष कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नजीक असणाऱ्या जनता सहकारी बँकेच्या शाखेस त्वरित भेट द्या. किंवा या योजनेविषयी शाखा व्यवस्थापक श्री.निलेश देशपांडे ७३८७१५१९६७ (कोल्हापूर), श्री.दिलीप दातार ९८५००४५०१५ (कऱ्हाड) व श्री.पुंडलिक सचिन ९७६६१६०६०६ (सांगली) यांच्याशी थेट संपर्क साधून तुम्ही याविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

जनता सहकारी बँक व्यवसाय करण्यासाठीच या क्षेत्रात कार्यरत आहे. पण गरजेनुसार बँकेने वेळोवेळी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून अशा योजना सुरु केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी चिपळूण येथे अशाच प्रकारचा महापूर आला होता व तेव्हादेखील लोकहितार्थ योजना सुरु करून बँकेने सामाजिक भान जपले होते. आता 'जन आधार' योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक पूरग्रस्त नागरिकांना आत्मसन्मान मिळावा, त्यांचे संसार/व्यवसाय पुन्हा नव्याने उभे राहावे इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

या प्रसंगावर काही ओळी आठवतात :

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा”

-----