गाणी ऐकत ऐकत अभ्यास..


 


गाणी ऐकत ऐकत अभ्यास करायला कुणा कुणाला आवडतं? प्रत्येकालाच ते आवडतं असंही नाही, आणि प्रत्येकाला ते जमंतं असंही नाही. मात्र ज्याला आवडतं त्याच्यासाठी अभ्यास करणं हे मजेचं काम होतं. म्हणजे स्पेशली गणितं सोडवताना आणि अकाउंट्सचे प्रॉब्लेम्स सोडवताना गाणी ऐकले की अभ्यास करायला ही मजा येते.

खरं तर लोक म्हणतील असं कसं? गाणी ऐकण्यात कॉन्संट्रेशन असेल तर अभ्यास कसा करणार? लोक म्हणतात शांतीत अभ्यास केला की तो अधिक चांगला होतो. मात्र अनेकांच्या बाबतीत हे खोटं ठरतं. माझ्या सारख्या अनेकांना गाणी ऐकत ऐकत अभ्यास करायला खूप आवडतं. एकदा आपल्या डोक्याचं रूटीन सेट झालं की कॉन्संट्रेशन करायला सोपं जातं.

असं म्हणतात गाणी ऐकल्या मुळे आपल्या ब्रेनचा एक भाग रिलॅक्स होतो. म्हणजे कॉन्संट्रेशन करण्यासाठी आपलं लक्ष्य केंद्रित करण्यासाठी डोक्याला अधिक चालना मिळते आणि सोबतच एका रिसर्च मध्ये हे सिद्ध झालं आहे की यामुळे लिहीण्याचा स्पीड वाढतो. असं म्हणतात शास्त्रीय संगीत व्यक्तिमत्वातील 'स्मार्टनेस' वाढविण्यास मदत करते. तसेच आपल्या मेंदूला म्यूझिक नोट्स मुळे चालना मिळते. 

गाणी ऐकत अभ्यास करताना तुम्ही काय लक्षात ठेवाल :

१. रॉकिंग किंवा मस्ती मूड असलेली गाणी ऐकणं टाळा, यामुळे लक्ष्य केंद्रित करणे कठीण जाऊ शकते.

२. आधीच्या काळई अनेक लोक रेडियो ऐकत अभ्यास करायचे, आता ही एफएम सोबत अभ्यास करता येऊ शकतो, यामध्ये वेरिएशन असल्यामुळे कंटाळा येणार नाही. 

३. खूप वेळ कानात हेडफोन लाऊन ठेऊ नये, यामुळे त्रास होऊ शकतो.

४. अतिशय संथ गाणी ऐकलीत तर झोप येण्याची शक्यता असू शकते.

५. आवडीची, मध्यम लयीतली गाणी ऐकत अभ्यास केला की नवीन ऊर्जेसह अभ्यास करणे शक्य होऊ शकते.

आवड आपली आपली, त्यामुळे हे केलंच पाहीजे असं नाही. मात्र एकदा हे करुन बघा. जमंलच तर अभ्यास करणे देखील मजेसारखे होईल.


- निहारिका पोळ सर्वटे