स्वॅग वाली आज्जी..

    29-Aug-2019
तुम्हाला ‘रेड’ नावाचा सिनेमा आठवतो का? त्यामध्ये जी आजी होती, तिचं कौतुक तेव्हा ही खूप झालं आताही होतंच आहे. त्याचं कारण म्हणजे या आज्जी म्हणजेच पुष्पा जोशी या एका अतिशय गमतीशीर, मजेदार अशा जाहीरातीत दिसल्या आहेत. पिडिलाईच्या फेव्हीक्विकच्या जाहीरातीत त्या झळकल्या आहेत, आणि त्यांनी प्रेक्षकांचे मन मोहून घेतले आहे.

 

 
या मध्ये त्या गॉगल लावून, मोठे कानातले घालून एकदम ‘स्वॅग वाल्या आज्जी’ दिसतायेत. या जाहीरातीची मजा बघूनच येईल. मात्र कौतुक या गोष्टीचं नक्कीच करावं लागेल की त्यांचं वय बघता, त्यांनी इतका छान अभिनय करावा तसेच त्यांनी इतकं Positive राहणं नक्कीच कौतुकास्पद आहे.

त्यांची कवीता “ जीवन अभी बाकी है “ देखील खूप व्हायरल झाली होती. पुष्पा जोशी मूळच्या जबलपुर मध्यप्रदेश येथील आहेत, त्यांनी लघुपट, चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. Have you seen this beautiful Ad. If you haven’t then do it right now.