तर आता हे जग आहे वेब सीरीझचं. आणि लोक डेली सोप्स बघण्यापेक्षा पटकन मोबाइलवर वेब सीरीझ बघणं जास्त प्रेफर करतात. आणि आपली मारठी माध्यमं देखील काही या शर्यतीत मागे नाही बरं का. गेल्या काही दिवसात मराठी भाषेत दोन वेब सीरीझ आल्या आहेत. आणि त्या दोन्ही नवरा बायकोच्या नात्यावर आहेत, मात्र एकदम उलट भाष्य करणाऱ्या. एक वेब सीरीझ फनी, रोमँटिक, स्वीट, क्यूट या पठडीत बसणारी तर दूसरी काहीशी सिरिअस, कदाचित काही संदेश देणारी, अशी आहे. मात्र दोन्ही वेब सीरीज अवश्य बघाव्या अशा आहेत. आणि त्या म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत या खऱ्या खुऱ्या नवरा बायकोंवर चित्रीत ‘आणि काय हवं” आणि सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे यांच्यावर चित्रीत ‘यू टर्न’.
तर पहिल्या वेब सीरीझ बद्दल बोललो तर तुमच्या पैकी अनेक लोक यूट्यूबवर ‘शिटी आयडियाज ट्रेंडिंग’ या चॅनल ला फॉलो करत असाल. साधारण त्यांमध्ये दाखवण्यात आलेल्या नवरा बायकोच्या गंमती जंमती सारखीच या जुई आणि साकेतच्या ‘मॅरिड’ आयुष्याच्या गंमती जमती आहेत. वरुण नार्वेकर यांनी या वेब मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. त्यामध्ये या जोडप्याचे पहिले घर, पहिली गाडी, पुरणपोळ्या, अशा अनेक गोष्टी आहेत. एकूणच हल्की फुल्की, स्ट्रेस बस्टर अशी ही वेब मालिका आहे. लग्न झालं असल्यास आपलीशी वाटणारी, नसल्यास मज्जा वाटणारी ही वेब मालिका नक्कीच बघण्यासारखी आहे.
दुसरी वेब सीरीझ म्हणजे राजश्री प्रोडक्शन्सची यू टर्न. ‘यू टर्न’ म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येतो गाडीतून फिरताना मारला जाणारा ‘यू टर्न’. मात्र हा यू टर्न जरा वेगळा आहे. आता ‘यू टर्न’ नक्की कोणता? कोणाचा? कशासाठी? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला ही वेबसीरिज पाहिल्यावर मिळणार आहेत. घटस्फोट होऊ घातलेल्या कपलची ही कथा आहे. या वेबसीरिजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव ही नवीकोरी जोडी स्क्रीन शेअर करणार असून पहिल्यांदाच हे दोघे एकमेकांसोबत काम करणार आहेत. या सीरिजची निर्मिती नेहा बडजात्या करत आहेत. तर दिग्दर्शनाची धूरा मयुरेश जोशी यांनी स्वीकारली आहे.
एकूण काय तर नवरा बायकोची नोक झोक, गम्मत, भांडणं, प्रेम हे सर्व इमोशन्स अनुभवण्यासाठी या दोन्ही वेबसीरीझ नक्की बघा.