हळू हळू जमतंय 
 
 
कठीण असतं रे हे कॉलेज बिलेज,
क्लास बिस ला जाणं,
सतत तेच तेच अभ्यासाचं रडगाणं
मार्कांची चिंता, कॉंपिटिशनचं प्रेशर
काय सांगू यात काय झालाय माझा हशर (हश्र)
पण जमतंय हळू हळू..
 
त्यातून पहिल्यांदाच कोणीतरी आवडतं,
सालं नशीब आपलं असंय ना
की घोडं मेलं कुठेतरी जाऊन अडतं
पुन्हा घरचे बोंबलतात, मोबाईल वगैरे काढून घेतात
पण जमतंय हळू हळू..
 
उगीच राग येतो कधीकधी सगळ्यांचा,
नकोसा होतो एक मॅसेज किंवा कॉलही कोणाचा
मग आपलं पर एक्सप्लेन करत बसा…
का नाही बोललो, काय झालंय वगैरे वगैरे..
पण ते ही जमतंय हळू हळू..
 
यालाच म्हणत असतील कदाचित अडल्टिंग..
आपण करत बसणार कुणाची तरी फिल्डींग
आणि मग जाणार आपलीच विकेट,
उध्वस्त वगैरे झाल्या सारखं वाटेल मग थेट..
तरी एकच म्हणू आपण..
जमतंय हळू हळू…