कँटीनचा समोसा आणि एक चहा..


 
 
 
कँटीनचा समोसा आणि एक चहा..
भुरभुरणारा पाऊस समोर पडतोय पहा
कॉलेजची मस्ती मजा आणि मित्र
प्रत्येकाच्याच आयुष्यात असावं हे चित्र
मग जेव्हा हळूचकन समोर येईल ती,
तिच्यातच हरवणार माझ्या मधला मी,
विचारेल अचानक काय झाले तुला?
मी म्हणीन पावसान वेडा केलंय मला..
का हे दृश्य फक्त स्वप्नात दिसतं?
खऱ्या आयुष्यात केवळ मोकळं आभाळ असतं.

- निहारिका पोळ सर्वटे