हिला भेटा : ही आहे इंटिरिअर माता

    23-Aug-2019
नाव ऐकून मजा वाटली असणार ना? आपल्या यूट्यूब चॅनल रिव्ह्यू या सेक्शन मध्ये अनेक अशी आगळी वेगळी नावं आपल्याला सापडतील. त्यातीलच ही एक इंटीरिअर माता. तर आपल्या सगळ्यांनाच आपलं एक छोटंसं घरकुल हवंय, ते आपलं असलं पाहिजे (म्हणजे रेंट वर का असेना पण त्यात आपलेपणा असला पाहिजे.) आणि ते सुंदर असलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र आजच्या काळात घराच्या इंटीरिअरवर अमाप पैसे खर्च करणं काही सगळ्यांसाठी शक्य नाही. अशा वेळी आपल्या मदतीला येते इंटीरिअर माता. ती यंग आहे, खूप रचनात्मक आणि कल्पकही आहे.
 
 
हिचं खरं नाव आहे अनन्या. ‘अफोर्डेबल होम डेकोर’ असं हिचं ध्येय आहे, आणि त्यासाठी ती यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून विविध व्हिडियोज, विविध फोटोज टाकत असते. तिचं यूट्यूब चॅनल खास चर्चेत आहे कारण यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घराला सुंदर बनविण्याचे अनेक प्रकार तिने दाखवले आहेत. त्यामुळे जर आपण होस्टेल मध्ये असू, रेंटेड घरात असू किंवा स्वत:च्या घरात असू कमी खर्चात चांगलं इंटीरिअर डेकोरेशन कसं होऊ शकतं, हे तिने सांगितलं आहे.
 
 
 
तर आपण हिचे व्हिडियोज फॉलो केलं की आपल्याला लक्षात येतं. कि घरातील उपस्थित वस्तूंमधूनच, किंवा डीआयवाय अर्थात डू इट युअरसेल्फ या टेकनीकनं ही इंटिरिअर माता आपल्यासारख्या भक्तांच्या मदतीला हजर होते. हिच्या अनेक व्हिडियोज मध्ये तुम्हाला एक किंवा दोन दिवसांचं चॅलेंज घेऊन न्यूली वेड्स कपलच्या खोलीचं मेकओव्हर, किंवा हॉलचं मेक ओव्हर असं सगळं दिसून येतं. यासाठी ती अतिशय कमी असं बजट देखील ठरवते. यामुळे एकूण आपल्या बजट मध्ये देखील आपण आपल्या खोलीला, घराला भिंतींना सुंदर असं रूप देऊ शकतो.
 
 
इंस्टाग्रामवर इंटीरिअर माता के १८ हजार फॉलेअर्स आहेत तर यूट्यूबवर हिचे २ लाख ७३ हजार सब्स्क्राइबर्स आहेत. वॉल मेकओव्हर, तसेच झाडा फुलांच्या मदतीने अगदी घरी असलेल्या साधारण गोष्टींच्या मदतीने होम डेकोर कसे करायचे हे बघण्यासाठी हिला नक्कीच फॉलो करा.