आमिर खानचा हा नवा अवतार बघितला का?

    09-Dec-2019
|


amir_1  H x W:  आमिर खान म्हणजेच मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्या चित्रपटांच्या निवडीमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र या चित्रपटांमध्ये असलेल्या त्याच्या लुकविषयी देखील नेहमीच चर्चा असते. मग दंगलसाठी त्याने वाढवलेलं वजन असू देत नाही तर मग सिक्रेट सूपरस्टार मध्ये असलेला त्याचा कूल लुक. तर आमिरचा असाच एक नवीन लुक ‘लीक’ झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ मधील त्याचा लुक इंटरनेटवर लीक झाला आहे, आणि या लुकविषयी एकच चर्चा सुरु आहे.
 
 

या लुकमध्ये त्याने केस वाढविले आहेत, त्याची दाढी देखील वाढलेली दिसतेय. त्याची भूमिका नेहमीपेक्षा हटके असणार आहे हे नक्कीच. नोव्हेंबर मध्ये आमिरने या चित्रपटातील त्याचा पहिला लुक शेअर करत म्हटले होते कि, “सत स्रिअकाल जी, मायसेल्फ लालसिंह चड्ढा”. त्याच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात एकच उत्सुकता लागलेली आहे. 
 

amir_1  H x W:  

हा चित्रपट हॉलिवुडच्या फॉरेस्ट गम्प या चित्रपटाचा रीमेक आहे, या चित्रपटाच आमिर सोबत करीना मुख्यभूमिकेत दिसणार आहे. थ्री इडियट्स या अतिशय गाजलेल्या चित्रपटानंतर दोघेही पुन्हा एकदा रुपेरी प़द्यावर दिसणार आहेत, त्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत.