दीपिका पादुकोण आणि कार्तिक आर्यनचा एअरपोर्ट डान्स बघितला का?

    05-Dec-2019
|


Deepika_1  H x


इमॅजिन करा आपण एअरपोर्टवर आहात आणि अचानक तुम्हाला दीपिका पादुकोण दिसते, ती कार्तिक आर्यनला भेटते आणि त्याच्या नवीन चित्रपटातील एका गाण्याचा स्टेप शिकण्यासाठी ती एअरपोर्ट बाहेरच तब्बल १० मिनिट नृत्य करतेय. अरे अरे हे स्वप्न नाही, हे खरंय.. आणि अनेकांना हे स्वप्नवत दृश्य खरं खुरं बघायला मिळालं आहे.
 

 
त्याचं झालं असं, की दीपिका एअरपोर्टवर आली आणि तेव्हाच तिला कार्तिक आर्यन भेटला आणि तिने त्याला सांगितले की त्याच्या नवीन चित्रपटातील एक गाण्याच्या स्टेप्स तिला काही जमत नाहीयेत. मग काय? कार्तिक ने ताबडतोब तिचा डांस क्लास सुरु केला थेट एअरपोर्टवरच. बघणारे अनेक लोक होते. मागे एअरपोर्ट सिक्योरिटी पोलिस पण होते, मात्र दीपिका आणि आर्यन या कशाचीही काळजी न करता, मस्त प्रॅक्टिस करत होते. 

दीपिकाचे कौतुक यासाठी कारण तिच्यात शिकण्याची जिद्द होती. तिला जो पर्यंत ती स्टेप जमली नाही, तोपर्यंत तिने शिकणं सोडलं नाही, अखेर तिला स्टेप जमल्यानंतर तिने दोन तीनदा प्रॅक्टिस केली आणि मगच ती फ्लाईट पकण्यासाठी गेली. मात्र याचे व्हिडियोज त्वरित व्हायरल झाले. आणि सगळ्यांनी या नृत्य शिकवणीचा आनंद घेतला. आहे की नाही मज्जा…