भाडिपाची आई निघाली भन्नाट सोलो ट्रिपला.. बघितलं का तुम्ही?

    03-Dec-2019


Bhadipa_1  H x  जगात भारी भाडिपाचे फॅन्स केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात, संपूर्ण जगात आहेत. अश्या या भन्नाट आणि यूनिक चॅनलवर व्हिडियोज देखील तसेच भन्नाट आणि यूनिक असतात. तर आता या भाडिपाची फेमस आई निघाली आहे सोलो ट्रिपला.. अनी आणि जुईला याचा मेजर धक्का बसलाय आणि त्यांना कळत पण नाहीये की आईला अचानक काय झालं? 

 
 
 
तर भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाची संपूर्ण फॅनफॉलोइंग प्रचंड एक्सायटेड आहे हे जाणून घ्यायला की भाडिपाची आई सोलो ट्रिपला कुठे जाणार आहे? आणि तिची ही ट्रिप कशी असणार आहे? मुळात भाडिपाला प्रसिद्धी मिळाली ती या आई मुळे. “शास्त्र असतं ते..” “बबू जा आंघोळ करुन ये”.. “अनी केस काप” ही तिची गाजलेली वाक्ये. आणि गंमत म्हणजे तिच्या या वाक्यांचे टी शर्ट्स आणि कॉफी मग्स देखील बाजारात आले आहेत. त्यामुळे सगळ्यांची ही लाडकी आई केसरीच्या माय फेअर लेडी ग्रुप सोबत सोलो ट्रिपला कुठे निघाली आहे या बद्दल तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

आता पर्यंत आपण आईसोबत गणपतीतिल मज्जा, आजी घरी आलेली असताना केलेली धमाल, आळशीपणाचा कळस असल्यामुळे खाल्लेली आईची बोलणी हे सगळंच अनुभवलं आहे मात्र बाबा, अनी, जुई, बबडू आणि बबु शिवाय आईची ही सोलो ट्रिप कशी असेल हे बघणं नक्कीच गंमतीशीर ठरणार आहे. तुम्ही अजून ही मजा बघितली नसेल तर नक्की बघा आणि स्टे ट्यून्ड कारण आता तर ही जर्नी सुरु झालेली आहे. बघू आता आईची ही सोलो ट्रिप कशी होते ते?