पंतप्रधान म्हणताएत ‘बनवा मीम्स’

    26-Dec-2019
|PM_1  H x W: 0


आज कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार म्हणून सर्व भारतीय उत्सुक होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्वत: उपस्थित राहून या ग्रहणाविषयी आपल्या सोशल मीडियावर माहिती आणि काही फोटोज शेअर केले होते. त्यावर काही मीम मेकर्स ने त्यांचा फोटो शेअर करत लिहीले होते, “इसका तो मीम बनेगा” आणि गंमत म्हणजे पंतप्रधानांनी हे ट्वीट रीट्वीट करत म्हटले कि, “मोस्ट वेलकम, एंजॉय”. आणि त्यांच्या या एका ट्विटने इंटरनेट वर चर्चा सुरु झाली.

 


पंतप्रधान यांच्या या कूल उत्तरामुळे यंगस्टर्समध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या या ट्वीटला १०९.४ हजार लोकांनी लाईक केले आहे तर २१ हजारांहून अधिक लोकांनी रीट्वीट केले आहे. गप्पिस्तान या ट्विटर हाँडल ने हा फोटो शेअर करत ‘याचे मीम बनेल’ असे लिहीले होते, आणि त्याला पंतप्रधांनांचे उत्तर मिळणे ते ही मीम बनवण्यासाठी स्वागत आहे असे म्हणणे म्हणजे मोठी गोष्ट आहे.


पंतप्रधान त्यांच्या ट्वीट्स मुळे नेगमीच चर्चेत असतात, मात्र सामान्य माणसाच्या ट्वीटला रीट्वीट करून असं कूल उत्तर दिल्यामुळे यंगिस्तानमध्ये त्यांच्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. फेसबुकवर देखील अनेक लोकांनी त्यांच्या या ट्वीट्सचे फोटो शेअर केले आहेत.

एकूणच काय तर आपले पंतप्रधान कूल आहेत, आणि तरुणांसारखे विचार करतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.