आईच्या हातचं.. भाडिपा Presents..

    20-Dec-2019
|


Bhatupa_1  H x


भाडिपा आपल्या वेगवेगळ्या व्हिडियोज आणि वेगवेगळ्या Ideas साठी प्रसिद्ध आहे. भाडिपाचे व्हिडियोज दरवेळी चर्चेचा विषय ठरतात आणि तरुणांना या व्हिडियोजचे आकर्षण पण असते. मग ते आई आणि प्रायव्हसी असो किंवा आई आणि गणपती. पण यावेळी भाडिपाची आई नाही, तर अनेक सेलेब्सच्या आया आपल्याला भेटायला येणार आहेत. भाडिपाच्या  दुसऱ्या चॅनलवर म्हणजेच भआटुपावर एक नवीन सीरीझ ‘आईच्या हातचं’ च्या माध्यमातून.

या सीरीझमध्ये सेलेब्रेटी तारका आपल्या आयांसोबत झळकणार आहेत. त्यांच्या आईच्या हातचं त्यांना सगळ्यात जास्त काय खायला आवडतं, ती डिश त्या आपल्या आईसोबत बनवणार आहेत. आणि प्रेक्षकांना याबाबत एकच उत्सुकता लागलेली आहे. 


या सीरीझमधला पहिला भाग आजच प्रदर्शित झाला असून यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री, भाडिपाची लाडकी जुई, म्हणजेच मृण्मयी गोडबोले आपल्या आई सोबत म्हणजेच गीता गोडबोले यांच्यासोबत झळकली आहे. या भागात तिच्या आईने खास तिच्या आवडीची मुद्दा भाडी, मिर्चीची भजी आणि पहिल्या वाफेचा भात केला आहे. एकूणच त्यांच्या गप्पा, लहानपणीच्या आठवणी ऐकायला मजा येते, आणि कुठेतरी अचानक आपल्या आईच्या हातची चव जिभेवर तरळते आणि आईची आठवण येते. 

गंमत म्हणजे या सीरीझमध्ये वेगवेगळ्या रेसेपीज देखील शेअर करण्यात येणार आहेत.  या मालिकेत अनेक तारका आपल्या आयांसोबत दिसणार आहेत , त्यामुळे एकूणच या सीरीझ विषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.