भाडिपा आपल्या वेगवेगळ्या व्हिडियोज आणि वेगवेगळ्या Ideas साठी प्रसिद्ध आहे. भाडिपाचे व्हिडियोज दरवेळी चर्चेचा विषय ठरतात आणि तरुणांना या व्हिडियोजचे आकर्षण पण असते. मग ते आई आणि प्रायव्हसी असो किंवा आई आणि गणपती. पण यावेळी भाडिपाची आई नाही, तर अनेक सेलेब्सच्या आया आपल्याला भेटायला येणार आहेत. भाडिपाच्या दुसऱ्या चॅनलवर म्हणजेच भआटुपावर एक नवीन सीरीझ ‘आईच्या हातचं’ च्या माध्यमातून.
या सीरीझमध्ये सेलेब्रेटी तारका आपल्या आयांसोबत झळकणार आहेत. त्यांच्या आईच्या हातचं त्यांना सगळ्यात जास्त काय खायला आवडतं, ती डिश त्या आपल्या आईसोबत बनवणार आहेत. आणि प्रेक्षकांना याबाबत एकच उत्सुकता लागलेली आहे.