ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

    17-Dec-2019
|


Shreeram lagoo_1 &nb
 

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
 
 

लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे.