आणि दीपिकाला अनावर झाले अश्रु..

    11-Dec-2019


Deepika_1  H x  कालच दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपट ‘छपाक’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि त्याबद्दल एकच चर्चा सुरु आहे. मात्र या ट्रेलर पेक्षाही दीपिकासाठी हा चित्रपट किती कठीण आणि किती महत्वपूर्ण आहे, याविषयी अधिक चर्चा सुरु आहे. ट्रेलर लॉंचच्या वेळी दीपिका भावुक झाली, आणि तिला अश्रु अनावर झाले. ‘छपाक’ हा अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्यामुळे तो तिच्यासाठी खूप स्पेशल आहे असे तिने यावेळी सांगितले. 
 
 

यावेळी स्वत:ला सावरत ती सांगते.. “असं खूप कमी वेळा होतं कि तुम्हाला एखादा चित्रपट करायचा कि नाही, यासाठी संपूर्ण नॅरेशन ऐकण्याची आवश्यकता नसते. कधी कधी ती कथा, तो विषयच असा असतो कि तुम्ही त्याला नाही म्हणूच शकत नाही. छपाक देखील असाच एक चित्रपट आहे. तुम्ही ट्रेलर बघाल आणि आम्ही मंचावर येऊ मी इतकीच तयारी केली होती, याबद्दल बोलावं लागेल त्यासाठी मी तयारी केलीच नव्हती. छपाक नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असलेला चित्रपट असेल.” 

छपाक ही लक्ष्मी अग्रवाल या एसिड अटॅक सर्व्हायवरची कथा आहे. २००५ मध्ये लक्ष्मीवर एसिड हल्ला झाला, आणि त्यानंतर तिचे आयुष्यच बदलले. मात्र तिने हार मानली नाही. लक्ष्मी आजही एसिड विक्रीच्या विरोधात कार्यरत आहे, आणि तिला अनेक पुरस्कार देउन सन्मानित देखील करण्यात आले आहे. तिची कथा रुपेरी पडद्यावर ‘मालती’ या नावाने दीपिका साकारणार आहे. दीपिकाने या चित्रपटातील तिचा पहिला लुक शेअर केला होता तेव्हा पासूनच याविषयी भरपूर चर्चा सुरु आहे. हा चित्रपट करणे आणि मालती साकारणे आतापर्यंतचे सगळ्यात कठीण आणि तितकेच स्पेशल कार्य होते, असं दीपिका सांगते.