अर्जुन कपूरचे त्याच्या आईला भावनिक पत्र

    23-Nov-2019अर्जुुन कपूर म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे येतो तो हँडसम, माचो असा एक हीरो. पण या सर्व हीरोजच्या देखील भावना कधी कधी जगापुढे येतात, आणि या भावना किती खऱ्या आहे हे सामान्य प्रेक्षकाला देखील जाणवतं. अर्जुनने नुकतीच इंस्टाग्राम अशीच एक भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानी त्याच्या आईला १९९७ मध्ये लिहीलेलं एक पत्र शेअर करत, तो त्याला त्याच्या आईची किती आठवण येते, हे सांगितले आहे.तो लिहीतो, “आईसाठी लिहीलेली ही कविता आज सापडली, माझ्या हस्ताक्षरासाठी माफ करा, मी ही कविता १२ व्या वर्षी लिहिली होती. कदाचित तो एका लहान मुलासाठी सगळ्यात पवित्र असा क्षण होता. जेव्हा मी तिचं प्रेम अनुभवलं, जेव्हा मला तिच्या प्रेमासाठी तिला थँकयू म्हणावसं वाटलं. आज तिचं हेच प्रेम मी खूप मिस करतो. रोज सकाळी तिच्या प्रेमाशिवाय मला असुरक्षित, भावनिक वाटतं. आता तिचं प्रेम मला कधीच मिळणार नाही, यावर विश्वास ठेवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. अनेकदा मला हा अन्याय वाटतो. मला याचा त्रास होतो, हेल्पलेस वाटतं. तिच्या तोंडून मला पुन्हा एकदा ‘बेटा’ ऐकायचंय. तिची मला खूप खूप आठवण येते, आणि मग मला सर्वच निरर्थक वाटतं. मी ८ वर्षांपूर्वी पूर्णपणे विस्खळित झाले, तुटलो. आत दर दिवशी मी स्वत;ला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्याकडे बघून हसण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. एक मुलगा म्हणून मी हे सगळं लिहीतोय, मला माहित नाही का आज मी या भावना व्यक्त करतोय पण मी सांगू इच्छितो की आयुष्य हे प्रत्येकालाच असेअनुभव देतो. मी काही हीरो नाही, मी देखील एक सामान्य माणूस आहे. आई मिस यू.. जिथे ही असशील आनंदी रहा. लव्ह यू द मोस्टेस्ट..” 

- अर्जुनत्याचे हे पत्र वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. अर्जुनच्या आईला कर्करोग होता. मोना कपूर तिचे नाव. अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले आणि यामुळे मोना अर्जुन आणि अंशुला यांना अनेक त्रास आणि यातना सहन कराव्या लागल्या. त्यातच अर्जुनचा पहिल्या चित्रपट ‘इशकजादे’ प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांआधीच अर्जुनची आई मोना कपूर यांचे निधन झाले. अर्जुनच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या मात्र त्याच्या आईचे त्याच्या आयुष्यातून जाणे त्याच्यासाठी सगळ्यात क्लेशदायक होते. त्याचे हे भावनिक पत्र वाचून आज कोणालाही वाईट वाटेल आणि त्रास होईल. More Power to you Arjun.