आणि पुणे झगमगले.. झोमालँडच्या प्रकाशात..

    19-Nov-2019 
आपल्या पुण्यात काहीतरी हॅपनिंग होतंय, आणि त्याला प्रतिसाद मिळणार नाही, असे होऊच शकत नाही हो ना? तर मग.. झोमॅटो या अनेक स्टूडेंट्स आणि बॅचलर्सच्या आयुष्यातील लाईफ सेव्हर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'झोमालँड' या फूड कार्निव्हल ला देखईल असाच भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. या कार्निव्हल मध्ये हजारो पुणेकर, पुण्यातील मोठे मोठे फूड ब्लॉगर्स आणि इन्फ्लूएँसर्स, दिग्गज कलाकार आदींनी सहभाग घेतला. 

 

 
पुण्यात झोमॅटोतर्फे १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी सगळ्यात मोठ्या फूड कार्निव्हल ‘झोमालँडचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे २० हजार हून अधिक उपस्थितांनी १० हून अधिक लाईव्ह परफॉर्मेंस आणि शहरातील प्रमुख ५३ रेस्टॉरेंट्सच्या ५०० हून अधिक खाद्य पदार्थांची मजा लूटली. 

पुण्यातील या भरघोस यशाबद्दल उत्साहित होत झोमॅटोचे ग्लोबल हेड - इव्हेंट्स चैतन्य माथूर म्हणाले की, “झोमालँडचे आयोजन गेल्या वर्षी देखील करण्यात आले होते, आणि गेल्या वर्षी देखील याला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आम्ही ही परंपरा पुढे नेण्याचा निश्चय केला आणि अधिक मोठ्या प्रमाणावर हा फूड कार्निव्हल आयोजित करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही समस्या नक्कीच आल्या मात्र तरी देखील दोन्ही दिवस या कार्निव्हलला उपस्थितांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तिसऱ्या दिवशी आमचे ध्येय पूर्ण झाले. “तीनही दिवस कार्निव्हल हाऊसफुल होता. २० हजार हून अधिक उपस्थितांना तिथे बघणं हा एक एविस्मरणीय अनुभव होता, मी पुण्याच्या नागरिकांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी शहरातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा फूड कार्निव्हल यशस्वीपणे घडवला.” असेही ते म्हणाले. 


 
या झोमालँडमध्ये पुणेकरांनी ५ वेग वेगळ्या झोन्स मधल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. फ्लेवर्स ऑफ इंडिया, डेझर्ट डिस्ट्रिक्ट, ऑल अमेरिकन, अराउंड द वर्ल्ड अ‍ॅन्ड लिटल एशिया अशा ५ वेगवेगळ्या झोन्स मध्ये डिझाइन करण्यात आलेल्या खाद्य पदार्थांकडे पुणेकर आकर्षित झाले. बर्गेमिस्टर, वोक एक्सप्रेस, पीटरस पॅन आणि एलडाराडो यासह पुण्याचे शीर्ष रेस्टॉरंट्स या मध्ये सहभागी झाले होते.

 

 
खाद्य पदार्थांच्या व्यतिरिक्त, डिव्हिन, हार्डी संधू, निखिल डिसूझा, द यलो डायरी आणि कलाकार कॉमेडियन राहुल दुआ आणि गौरव कपूर यांच्यासह कलाकारांनीही प्रेक्षकांना आकर्षित केले. 

 

चैतन्य पुढे म्हणाले, “आमच्याकडे देशातील काही सर्वोत्कृष्ट कलाकार होते, शहरातील सर्वाधिक नामांकित रेस्टॉरंट्स मधील चविष्ट पदार्थ होते आणि या संपूर्ण वातावरणामुळे उपस्थितांना घरी जायचे नव्हते. आमच्या साठी ही खूप आनंदाची बाब आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा झोमालँड पुण्यात आणण्याची आम्ही वाट बघतोय.” 

 

 

डिव्हाइन, झोमालँड मध्ये परफॉर्म करणाऱ्या या कलाकारांनी उत्साहित होत सांगितले की, “ हा एक फूड कार्निव्हल होता, मात्र झोमालँडची ऊर्जा काही वेगळीच होती. मी माझी आवडती गाणी परफॉर्म करत येथील चविष्ट पदार्थांवर ताव मारला. मला इथे गाणी सादर करण्यात मजा आली” डिव्हाइन दिल्ली, बंगळुरु आणि हैदराबाद येथील झोमालँडमध्ये देखील सादरीकरण करणार आहे. 

कार्निव्हल थीमला पुणेकरांनी जोरदार प्रतिसाद दिला, इथे इन्टा फोटो बूथ, फूड झोन्स, फेरी व्हील आणि मजेदार कार्निव्हल गेम्स आदीचे आयोजन देखील करण्यात आले. पुणेकरांनी या कार्निव्हलचा भरपूर आनंद घेतला.

एकूणच पुण्यात ‘कूल आणि पॉझिटिव्ह व्हाईब्स’ जाणवल्या.