मराठमोठी काजोल.. दिसणार या भूमिकेत..

    18-Nov-2019

 

 
 
गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्राम आणि पूर्णच इंटरनेटवर “तान्हाजी” या चित्रपटाच्या पोस्टर्सने धुमाकूळ घातला आहे. त्यात अजय देवगण याचा हा १०० वा चित्रपट असल्या कारणाने या विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. मात्र यामध्ये जर सगळ्यात जास्त लक्ष्यवेधक काही असेल तर ते म्हणजे यातील कलाकारांचा लुक. नुकताच या चित्रपटातील काजोलचा मराठमोळा लुक प्रेक्षकांसमोर आला आहे आणि We just couldn’t stop looking at her.
 

 
या चित्रपटात काजोल ही सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा शरद केळकर दिसणार आहे. एकूणच या सिनेमाची स्टारकास्ट बघता याविषयी प्रेक्षकांच्या मनात इंटरेस्ट निर्माण झाला आहे. आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळणार असे आतापासूनच सांगण्यात येत आहे.  काजोलच्या या लुकमुळे नेटकऱ्यांना काजोलच्या लग्यातल्या लुकची आठवण झाली आहे. 
चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे, यामध्ये मुख्य म्हणजेच तान्हाजी मालुसरे यांत्या भूमिकेत अजय देवगण तर खलनायकाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. शरद केळकर आणि काजोल यांची देखील महत्वाची भूमिका असणार आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित मराठी लढवैय्या तान्हाजीवर चित्रपट येणार असल्यामुळे मराठी प्रेक्षक आनंदी आहेत.