अक्षय कुमार देतोय गुडन्यूज ?

    14-Nov-2019हेडिंग वाचून गंमत वाटली असेल ना? अरे इंस्टा पोस्टर पाहून पहिल्यांदा आम्हाला ही गंमतच वाटली. तर अक्षय कुमार याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीझ झाले आहे, आणि संपूर्ण इंटरनेटवर त्याचीच चर्चा आहे. कारण हे पोस्टर आहेच इतके फनी.

 


अक्षय कुमारचा नवीन चित्रपट ‘गुडन्यूज’ २७ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. या आधी आलेल्या पोस्टर्समध्ये दोन गरोदर महिलांचे पोट आणि अक्षय कुमार दिसत होते. या दोन महिला कोण असा प्रश्न देखील नेटीझन्सना पडला होता, मात्र आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, करीना कपूर खान आणि कियारा आडवाणी या दोन महिला आहेत. नेमकी या चित्रपटाची काय कथा असणार याचा अंदाज जरी आला असला तरी याबाबत चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.


या चित्रपटात अक्षय कुमार, कियारा आडवाणी आणि करीना सह दिलजीत दोसांझ देखील आहे. करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शन्स द्वारा प्रदर्शित या चित्रपटात करीना आणि अक्षय तब्बल ९ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. या आधी ऐतराज, बेवफा, अजनबी आणि कंबख्त इश्क सारख्या चित्रपटांमधून त्यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र काम करताना बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.