‘तेजाज्ञा’ चं दिवाळी कलेक्शन बघितलं का?

    22-Oct-2019 
 
तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन नावाजलेल्या अभिनेत्री आहेत, आणि त्यांनी एकत्र सुरु केलेल्या ब्रँड 'तेजाज्ञा'बद्दल आपण सगळ्यांना माहीतच आहे. गेल्या ४ वर्षांपासून अभिज्ञा आणि तेजस्विनी यांनी ‘खणाच्या’ विविध डिझाइन्सचा कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे. आणि आता त्यांचं दिवाळीनिमित्त खास कलेक्शन आलेलं आहे. आणि त्याला तितकाच खास प्रतिसाद मिळालेला आहे. 
 
 
 

या दिवाळी कलेक्शन मधील खास म्हणजे “पॉकेटसाडी”, “ खणावर एम्ब्रॉयडर्ड कोल्हापुरी साज आणि ज्वेलरी”, “मेन्स कुरते”, “मिकी माउस साडी”, “खणाचे जमसूट्स”, "खणाची पैठणी" आदी आहे. साडी नेसल्यावर अनेकदा फोन कुठे ठेवायचा, थोडेसे पैसे घेऊन बाहेर पडायचं असेल तर काय करायचं असे अनेक प्रश्न येतात त्यासाठी तेजाज्ञा घेऊन आले आहेत पॉकेट साडी. आजच्या मुलींना धावपळीच्या रोजच्या रूटीनध्ये खूप सोन्याची ज्वेलरी घालायला आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी खास खणाच्या कपड्यावर कोल्हापुरीसाज, पुतळीहार आदी दागिने एम्ब्रॉयडरी केलेले आहेत. खणाच्या जमसूट्सना तर खूप डिमांड असल्याचे ‘तेजाज्ञा’ ने सांगतिले आहे. सोबतच नथ एम्ब्रॉडरी असलेले वन पीस, जॅकेट कुरता यांचा देखील समावेश या कलेक्शनमध्ये आहे.


याविषयी ‘तेजाज्ञा’ सांगतात की, “आम्ही कंफर्ट आणि ट्रेडिशन या दोन्हीची सांगड घालायचा प्रयत्न केला आहे. आपली संस्कृती जपताना लोकांना काहीतरी हटके आणि यबनीक घालता यावं यासाठी आम्ही असे वेगवेगळे प्रकार घेऊन आलो आहोत. जी आमची ‘यूएसपी’ आहे.” त्यांच्या प्रदर्शनातील खास बाब म्हणजे “खणाची ज्वेलरी” जी ऑनलाइन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. यामध्ये खणाच्या कपड्याचे कानातले, झुमके, ठुशी इत्यादी आहे. तर मग दिवाळीसाठी खास तेजाज्ञा कडून शॉपिंग करणार का नाही?