गूगलकडून डूडलच्या माध्यमातून कोरोना योध्यांचे आभार

    26-Apr-2021   
|
 
चांगल्या कार्याची दाखल घेत कोणी त्याचं कौतुक केले की आपोआपच त्या व्यक्तीचे किंवा समुदायाचे मनोबल उंचावण्यात मदत होते. संपूर्ण जगाला वेढा देऊन बसलेल्या कोरोना महामारीमुळे हाहाकार माजत आहे. अशा वेळी त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे कोरोना योद्धे वेगवेगळ्या ठिकाणी लढत आहेत. त्यांच्या कार्याला अजून गती यावी यासाठी गूगल(Google) ने आज विशेष डूडल(Doodle) बनवून कोरोना योध्यांचा सन्मान केला आहे. कोरोना योध्यांमध्ये आरोग्य खात्याशी संबंधित सर्व व्यक्ति, संशोधन करणारे, पोलिस विभाग, सफाई कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये दिवसरात्र मेहनत करणारे वोरीयर्स यांचा समावेश होतो.
 
Doodle_1  H x W
गूगल(Google) हे नेहमीच आपल्या डूडलच्या माध्यमातून नवीन विषय लोकांसमोर अगदी सोप्या पद्धतीने आणून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.  हे साहजिकच आहे की गूगल हे संकेतस्थळ जागतिक स्थरावर जगाच्या कोणत्याही कोपर्यातल्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातला वापरातला भाग आहे. गूगलने(Google) या (Doodle) मध्ये G या अक्षराला पाय लावले आहेत. दुसरा O आणि g च्या वर लाल रंगाचे बदाम(Heart) काढले आहे. शेवट काढल्या गेलेल्या e या अक्षराला संपूर्ण बदलले आहे. याला रिसर्चरच्या संबंधित दाखवले गेले आहे.
 
 
 
तुम्ही जर डूडलवर(Doodle) कर्सर घेऊन गेलात तर तुम्हाला तिथे एक संदेश दिसेल "To all the public health workers and to researchers in the scientific community, thank you". जेव्हा तुम्ही डूडल वर क्लिक करताल तेव्हा तुम्हाला गूगलच्या सर्च बार वर thank you coronavirus helpers असे लिहलेले दिसेल. यानंतर एक पेज उघडेल. अशा प्रकारे गूगल ने डूडलच्या माध्यमातून कोरोना योध्यांच्या कार्याची पावती देत त्याचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. मानवाच्या या कठीण परीक्षेमध्ये एकमेकांना धीर देणे म्हणजे एक प्रकारे लढण्यास नवीन बळ देणे होय. आपण ही लढाई धीराने लढली तर नक्कीच जिंकू. घरी राहा, सुरक्षित राहा आणि या कोरोना योध्यांना सहकार्य करा.