मास्टरब्लास्टर पूर्व क्रिकेटर सचिन तेंडूलकर याला कोरोनाची लागण

    27-Mar-2021   
|
 
 
आपण पाहात आहोत की पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. जगाबरोबरच भारतातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला कोणीही अपवाद नाही. भारताचा पूर्व क्रिकेटर सचिन तेंडूलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. मास्टरब्लास्टर ने आपली कोरोना टेस्ट पॉजिटिव आली असल्याची माहिती ट्वीट करून दिली. तो सध्या होम क्वारंनटाईन असल्याचे सांगितले. त्याच्या घरातील बाकीच्या सदस्यांच्या टेस्ट निगेटीव आली आहे. 
 
champion_1  H x
 
सचिन ने 7 ते 21 मार्च या दरम्यान रायपुर मध्ये झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मध्ये भाग घेतला होता.तो या टूर्नामेंट मध्ये इंडिया लीजेंड्स चा कप्तान होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली इंडिया लीजेंड्स टीमला चैम्पियनशिप पण मिळाली. टीमने कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ते नियम पाळले होते. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या आधी सर्व खेळाडूंच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या.

champion_1  H x
 
अशाप्रकारे फिल्मस्टार कार्तिक आर्यन ते  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ही  परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. देशात काही ठिकाणी काटेकोर आणि कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जे नियम सरकारने सांगितले आहेत ते पाळणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.