केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी मध्ये कॉंग्रेस सरकार पडले

    22-Feb-2021   
|
 
narayanswamy_1  
 
पुदुच्चेरी विधानसभेत काही दिवसांपासून चालू असलेल्या गदारोळातील एक घटना मध्ये आज पुदुच्चेरी येथील वी.नारायणस्वामी स्थापित सरकारला विधानसभेचे स्पीकर यांनी सांगितल्याप्रमाणे बहुमत चाचणी करावी लागली. त्यात वी.नारायणस्वामी यांच्या सरकारला अपयश आले. मुख्यमंत्री वी.नारायणस्वामी यांनी आपला राजीनामा उपराज्यपाल तामिलसाई सुदराराजन यांच्याकडे सोपविला.
 
 
काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार पडणार यांची दाट शक्यता होती. त्यात भरीतभर रविवारी काँग्रेस आणि DMK यांच्या प्रत्येकी एका आमदाराने राजीनामा दिला आणि सरकार पडण्याचा अधिक धोका निर्माण झाला. वी.नारायणस्वामी यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर पुदुच्चेरीची विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. एप्रिल किवा मे मध्ये येथे नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत.


माजी नायब राज्यपाल किरण बेदी याना काही दिवसापूर्वी पदावरून हटवण्यात आले होते. त्यांनतर तामिलसाई सुदराराजन यांची निवड त्या पदावर करण्यात आली. किरण बेदी तुघलकी कारभार करत होत्या असं आरोप त्यांच्यावर होता. अश्या पद्धतीने वातारण तापले होते. पुदुच्चेरी विधानसभा ३३ सदस्यीय आहे. त्यात काँग्रेस-DMK आघाडीची आमदारांची संख्या ११ आणि विरोधी पक्षाची संख्या १४ वर आली आहे.