‘कोरोना' वरती 'कोरोनिल' प्रभावी, पतंजलीने रिसर्च पेपर केला प्रकाशित

    19-Feb-2021
|

 
coronil_1  H x
 
 
कोरोना वरील प्रभावी लशीसाठी जगभरातले लोक प्रतीक्षा करत आहेत अशातच, योगगुरू रामदेव बाबा यांनी स्वदेशी बनावटीची कोरोनिल गोळी ही कोरोना रोगावर प्रभावी ठरत असल्याचा पुन्हा एकदा दावा केला होता. पहिल्या वेळी त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर, केंद्रीय आयुष मंत्रालयाने देखील त्यांना त्याबाबत सुनावले होते. मद्रास कोर्टाने तर १० लाखांचा दंड ठोठावला होता.
 
 
 
 
 
 
आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी कोरोना वरती कोरोनिल प्रभावी असल्याचा दावा केला असून, त्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी एक रिसर्च पेपर सादर केला आहे. या रिसर्च पेपरच्या सादरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना देखील बोलवण्यात आले होते.
 
 
 
 
 
आता पुन्हा एकदा कोरोनीलवरून सर्व स्तरात चर्चा होताना दिसत आहे. या वेळी रामदेवबाबा आणि उपस्थितांनी Certificate of a Pharmaceutical Product चे प्रमाणपत्र प्रकाशित केले. CoPP हे कोणत्याही औषधाचा दर्जा ठरवण्यासाठी दिले जाते आणि WHO (World Health Organisation) कडून हे प्रमाणपत्र दिले जाते.