किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल या पदावरून दूर हटवले

    17-Feb-2021   
|


 
 
kiran bedi_1  H
 
 
काल रात्री केंद्र सरकारने किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल या पदावरून दूर हटवले. मुख्यमंत्री वी .नारायणस्वामी यांनी १० फेब्रुवारी रोजी , किरण बेदीना पदावरून हटवण्यात यावं अशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून विनंती केली होती. आता तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तामिळीसाई सुंदरराजन यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल म्हणूनअतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
 
 
 
२०१६ पासून किरण बेदी यांनी नायब राज्यपाल या पदाचा भार सांभाळला होता. बऱ्याच दिवसांपासून पुदुच्चेरीचे कॉंग्रेस सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात वाद सुरु होते. त्यामागे किरण बेदी मनमानी कारभार करतात असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्याचाच एक रूप म्हणजे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वी .नारायणस्वामी यांनी राजनिवास या नायब राज्यपालांच्या निवासासमोर आंदोलन केलं होते.
 
 
त्यासोबतच काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामा दिला यामध्ये एक व्यक्ति आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. पुढील एप्रिल-मे महिन्यात तेथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. पदावरून कमी झाल्यावर त्यांनी ट्विटर वर राजनिवास आणि सहकार्यांचे आभार मानले.