मध्यप्रदेशमध्ये ५४ प्रवाशी असणारी बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली

    16-Feb-2021
|
मध्यप्रदेशमध्ये सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ५४ प्रवाशी असलेली बस कालव्यामध्ये कोसळली आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत असून अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
 
 
यामध्ये सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून इतर प्रवाश्यांचा शोध घेतला जात आहे.बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघात झाल्यांनतर सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
 
 
कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच पाण्यात  बुडाली आहे. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.कालव्यातील बसचा शोध घेत असताना अडथळे येत असल्यामुळे बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेत तेथील जिल्हाधिकाऱ्य़ांशी या घटनेबाबत चर्चा केली आहे.