‘हम दो, हमारे दो’नुसार देशाचा कारभार चार लोकांच्या हाती - राहुल गांधी

    12-Feb-2021
|

rahul gandhi _1 &nbs
 
 
 
 केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या कृषी कायद्यांमुळे मोठमोठ्या उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठाही करता येईल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. केंद्र सरकारवर टीका करत असताना राहुल यांनी, कुटुंब नियोजना संदर्भात असणारी हम दो, हमारे दो या जुन्या घोष वाक्याचा संदर्भ देत केवळ चार लोक देशाचा कारभार करीत आहेत आणि सर्वानाच त्यांची नावे माहित आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
 
 

दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना राहुल गांधी यांनी पाठींबा दिला आहे.त्याचबरोबर हे केवळ शेतकऱ्यांचेच आंदोलन नाही तर हि एक देश चळवळ आहे आणि सरकारला कायदे रद्द करावेच लागतील, असेही राहुल गांधी लोकसभेत म्हणालेत.
 
 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २०० जणांचा मृत्यू झाला त्यांना केंद्र सरकारने श्रद्धांजली वाहिलेली नाही, त्यामुळे श्रद्धांजली वाहण्याच काम आपल्याला करावे लागत आहे, असे म्हणून राहुल गांधी यांनी दोन मिनिटे शांतता पाळून मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याला तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने पाठिंबा दिला. नव्या कायद्यांमुळे भारताची अन्न सुरक्षा यंत्रणा धोक्यात येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हानी पोहोचेल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.