#ArthShastri- बजेट डोक्यावरून जाण्याची चिंता? आता नको..

    27-Jan-2021   
|
 - Priyanka Kamble 
 
अर्थशास्त्र हा विषय जीवनचक्रामध्ये किती महत्वाचा आहे, हे लॉकडाऊनमध्ये पाहिलेल्या आर्थिक चुनचुनीतून जाणवलंच असेल. बाकीच्या विषयांप्रमाणे जीवनाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी अर्थशास्त्र हा विषय प्रत्येकाने आवडीने समजून घेतलाच पाहिजे.

१ फेब्रुवारी म्हणजे बजेटचा दिवस. उत्सुकता तर खूप असते मग टीवी समोर channel लावून बघायला बसतो पण हळूहळू गोष्टी डोक्यावरून जायला लागतात. मग अपोआप channel बदलला जातो. या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व सामान्यांना बजेट विषयी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 
Uk_1  H x W: 0  

अर्थ मंत्रालायाकडून पुढील काही दिवस बजेट मधील संकल्पना आता आपल्याला सोशल मिडीयावर सोप्या भाषेत समजावून सांगण्यात येणार आहेत. बजेट विषयी जनजागृती करणे हा त्यामागचा हेतू असणार आहे. यात आकर्षक अनिमेटेड विडीओ दाखवण्यात आले आहेत.

‘अर्थ’ या विद्यार्थ्या कडून बजेट विषयी प्रश्न विचारण्यात येतील ज्याला डॉ.शास्त्री या प्राध्यापिका उत्तरे देतील.
यासाठी twitter वर #ArthShastri या नावाने hashtag सुरु करण्यात आला आहे. किवा Facebook वर खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही विडीओ पाहू शकता.

लॉकडाऊनमध्ये सतत ऐकलेले आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे? त्यामागचा हेतू काय? या धोरणातून आपली ढासळलेली अर्थव्यवस्था कशी सुधारेल हे या विडीओ मध्ये सांगितले आहे.
 
 
National Infrastructure Pipeline(NIP) आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारने मान्य केलेले प्रकल्प यांची संपूर्ण माहिती खालील लिंक मध्ये दिली आहे . 
 
 
Global Innovation Index की आहे त्यात रंकिंग कसा केले जाते या बद्दल ची सविस्तर माहिती खालील विडीओ लिंक मध्ये दिली आहे.

 
लॉकडाऊनमध्ये बातम्यात ऐकलेला Credit Ratings या शब्दांचा नक्की अर्थ काय याची माहिती डॉ.शास्त्री यांनी खूप सोप्या बाहेत दिली आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.
 
 
Purchesing Manager’s index(PMI) याबद्दल सुटसुटीत माहिती खालील लिंक वर दिलेली आहे.

 
Green bond काय आहे? त्याच स्वरूप आणि फायदा हे खालील लिंक वर दिले आहे.

 
Net barter terms of trade index म्हणजे काय? त्यात आयात आणि निर्यात याचा की वाटा आहे याची माहिती खालील लिंक वर दिले आहे.