कोविड काळातलं स्पेशल रक्षाबंधन #RakhiSpecial

    03-Aug-2020
|
आजचा दिवसंच मुळी खास आहे. आस रक्षाबंधन आहे ना, राखी पौर्णिमेचा दिवस हा सर्व बहीण भावांसाठी अतिशय स्पेशल असा दिवस असतो. सकाळी पासून राखी बांधण्याची असलेली गडबड, मज्जा आणि भरपूर खाण्याची चंगळ. मात्र या वेळची राखी पौर्णिमा ही नक्कीच वेगळी असणार. त्याचं कारण आहे, कोविड. काही लोकांकडे म्हणयाचं झालं तर या कोविडचं वरदानचं मिळालं आहे, त्याचं कारण म्हणजे जे भाऊ कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये असतील, ते भाऊ या कोविडपाई का होईना वर्कफ्रॉम होम घेऊन घरी आले असतील, ज्या बहिणी वेगवेगळ्या शहरांमध्ये कामानिमित्त, शिक्षणानिमित्त असतील, त्या आज घरी आल्याअसतील. त्यामुळे कितीतरी वर्षांनी भाऊ बहिणींची ही राखी पौर्णिमा, आनंदानी साजरी होणार.


Rakhi_1  H x W:


तर या वर्षीच्या या राखी पौर्णिमेत खास असं काय असणार ? चला तर मग बघूयात :

१. मास्क आणि सेनिटायझरचं गिफ्ट : खरं म्हणजे राखी पौर्णिमा ही खास का असते, तर या दिवशी बहीण आणि भाई एकमेकांच्या रक्षाणाचं वचन या दिवशी एकमेकांना देतात. आता कोविडच्या या काळात एकमेकांचं रक्षण कसम करता येईल ? उत्तर आहे मास्क आणि सॅनिटायझर, तर या दिवशी अनेक बहीण भाऊ एकमेकांना मास्क आणि सेनिटायझरचं गिफ्ट देऊन एकमेकांचं रक्षण करण्याचा वचन देताएत. वाटायला ही गंमत नक्कीच वाटू शकते, मात्र हे एक प्रतीक आहे, एकमेकांच्या रक्षणाचं.


Rakhi_1  H x W:


२. व्हर्चुअल ओवाळणी : अनेक भाऊ बहीण असेही असतील जे या कोविडच्या काळात एकमेकांपासून लांब आहेत. तर वर्षी जसा आते मामे भावंडांचा गोतावळा जमून रक्षाबंधन सेलिब्रेट करायचे तसं काही यावर्षी शक्य नाही, मग असे असताना काय बरं करायचं, याचं उत्तर आहे व्हर्चुअल सेलिब्रेशन. या दिवशी बहीण आपल्या भावाला व्हर्चुअली ओवाळू शकते. खरं म्हणायचं तर यात ते एकत्र असण्याचं फीलींग नक्कीच येणार नाही, मात्र जवळ असल्याची भावना नक्की येईल. करून बघा, आवडेल तुम्हाला.


Rakhi_1  H x W:


३. ऑनलाईन गिफ्ट : राखीच्या दिवशी भाऊ बहीण एकमेकांना प्रेमाचं प्रतीक म्हणून भेटवस्तु देतात. आता ते दिवस गेले कि जिथे फक्त भाऊ बहीणीला ओवाळणी देत असे. मात्र जर भाऊ बहीण एका शहरात नाहीत, एका घरात नाहीत, बाहेर दुकानं बंद आहेत, बाहेर जाणं सध्या शक्य नाही, योग्य नाही असे असताना भेटवस्तु द्यायची कुछून ? उत्तर आहे ऑनलाईन गिफ्ट. तुम्ही तुमच्या भाऊ बहीणींना ऑनलाईन पैसे ट्रांसफर करू शकता, त्यांना आधी पासून ठरवून ऑनलाईन गिफ्ट्स पाठवू शकता. या कोविडच्या टेंशनच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर या एका छानशा गिफ्ट सोबत एक छानसं हास्य खुलवू शकता.

४. डीआयवाय राखी : आता बाहेर कोरोना आहे म्हटल्यावर राखी खरेदी करायला बाहेर कसं जायचं ? हा एक मोठा प्रश्न आहे. यासाठी तुम्ही एक करू शकता कि, घरच्या घरी उपलब्ध साहित्यातून तुम्ही अनेक डीआयवाय राखी आपल्या भावासाठी तयार करू शकता. घरच्या घरी करण्याचं समाधान आणि आपल्या हातानी केल्याचा आनंद तुम्ही आपल्या भावाला देऊ शकता. यापेक्षा मोठा आनंद असेल तो काय हो ना ? डीआयवाय राखी तयार करण्याचे अनेक यूट्यूब ट्यूटोरिअल्स आहेत, त्यावरुन तुम्हाला या राख्या तयार करता येऊ शकतात.


Rakhi_1  H x W:

५. डीआयवाय भेटवस्तु : कोविडकाळात बाहेर जाणं शक्य नसेल, ऑनलाईन गिफ्ट मागवणं शक्य नसेल आणि तुम्ही भाऊ बहीण एकत्र एका घरात असाल तर तुम्ही तुमच्या बहीणीला किंवा भावाला डीआयवाय भेटवस्तु अर्थात स्वच:च्या हातानी बनवलेली भेटवस्तु देऊ शकता. यामुळे तुमच्या भावंडाला होणारा आनंद शब्दात व्यक्त नाही करता येणार. याशिवाय तिच्या/त्याच्या साठी लहानपणीपासून ते आतापर्यंतच्या फोटोचा कोलाज, किंवा व्हिडियो, सर्व बहीणींनी मिळून एकत्र भावाला शुभेच्छा देणं, आणि एखादी कविता हे देखील उत्तर भेटवस्तुचे पर्याय आहेत, यामध्ये प्रेमाचा ओलावा ही असतोच, आणि याहून सुंदर गिफ्ट असेल ते काय ?

प्रश्न कितीही असोत त्याची उत्तरं ही असतातंच. कोविड आहे आता राखी पौर्णिमा कशी साजरी करायची ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेलंच, मात्र कोविडकाळ असून सुद्धा तुम्ही त्याच आनंदात, त्याच जल्लोशात हा सण साजरा करु शकता. एकदा करून तर बघा. अविस्मरणीय असा होईल या वर्षीचा राखी पौर्णिमेचा सण.

- निहारिका पोळ सर्वटे