कॉलेज लाईफ मिस करताय ? मग आजच करा हे !!!

    23-Jun-2020
|
असं म्हणतात कॉलेज लाईफ म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सगळ्याक सुवर्ण काळ | केअरफ्री आयुष्य, जगाची चिंता नाही, मित्रांसोबतची मज्जा, करिअरचं थोडंसं टेंशन, आणि एकूणच तुम्ही या आयुष्यात मुक्तपणे जे जे करू शकता, ते सर्व तुम्ही या काळात करु शकता. आणि नक्कीच हा काळ निघून गेल्यानंतर तुम्ही हा काळ मिस करत असाल. आणि लॉकडाउनच्या काळात तर विशेष करून तुम्हाला तुमचा हा केअरफ्री सुवर्ण काळ नक्कीच आठवत असणार, तसं असेल तर आजच करा हे..


college_1  H x


आता तुम्ही विचाराल हे म्हणजे काय?

१. मित्रांसोबत व्हिडियो कॉल : कॉलेजच्या मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकदा व्हिडियो क़ॉल करा आणि त्या काळात केलेली धम्माल आठवा, तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा कॉलेजला गेल्या सारखे वाटेल. यामुळे जुन्या मैत्रीला नवीन कव्हर मिळेल, आणि जुने नाते संबंध पुन्हा एकदा नव्याने टवटवीत होतील.

२. जुने एल्बम्स : जुन्या एल्बम्स मध्ये आयुष्यातले खूप महत्वाचे क्षण लपलेले, टिपलेले असतात. या जुन्या एल्बम्स ला चाळण्यात, बघण्यात, आठवणींमध्ये रमण्यात कसा वेळ निघून जातो कळतच नाही, त्यामुळे एकदा आपल्या कॉलेजच्या काळातील फोटो एल्बम्स नक्की बघा, तुम्हाला पुन्हा एकदा ते क्षण जगल्यातं फीलिंग येईल.


college_1  H x


३. जुन्या वस्तुंना नीट नेटकं सजवून ठेवा : घरातला एक कप्पा तुमच्या कॉलेजच्या आठवणींसाठी ठरवून टाका. या कप्प्यात तुमच्या कॉलेज काळातील तुम्हाला मिळालेली भेटवस्तु, तुम्ही जिंकलेले मेडल किंवा मिळवलेली ट्रोफी, कॉलेजच्या शेवटच्या दिवशी कॉलेजच्या शर्ट वर लिहीलेले मित्रांचे मॅसेजेस. हे सगळं त्या कप्प्यात ठेवा, हा कप्पा फक्त तुमचा असेल, तुमच्या कॉलेज्या आठवणींसाठी ठेवलेला एक खास कप्पा.

४. कॉलेजच्या प्रोफेसर्सना एखादा फोन : कॉलेज म्हणजे केवळ मित्र नाही, कॉलेज म्हणजे केवळ मज्जा नाही तर कॉलेज म्हणजे काही डेडिकेटेड प्रोफेसर्स देखील. तुमच्या आवडत्या प्रोफेसरांना एखादा फोन किंवा मॅसेज करा, त्यांची आठवण काढा, त्यांना विचारा, त्यांना देखील यामुळे आनंदच होईल.

तर मग पुन्हा एकदा कॉलेज लाईफ जगणार ना ?