सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युमुळे पुन्हा एकदा ‘नेपोटिझम’ वर वाद

    17-Jun-2020
|

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. आणि यामुळे संपूर्ण बॉलिवुड मध्ये खळबळ माजली आहे. सुशांत सिंहच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवड मध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, आणि पुन्हा एकदा बॉलिवुडमधील परिवारवाद म्हणजेच ‘नेपोटिझम’ विषयी रान उठले आहे. सर्वप्रथम या विषयावर कंगना रणौत ने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइल वरुन मत मांडले, आणि बॉलिवुड मधील नामवंत परिवार आणि नेपोटिझमला पाठींबा देणारे दिग्दर्शक जसे कि करण जौहर यांना खडे बोल सुनावले त्यानंतर याविषयी खूप लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आणि एकूणच याविषयी टीकासत्र सुरु झालं आहे.


Sushant Singh_1 &nbs


असं सांगण्यात येत आहे कि सुशांत सिंहला त्याच्या कामाची पावती म्हणून कधीच अवॉर्ड्स देण्यात आले नाहीत. करण जौहर सारख्या नामवंत दिग्दर्शकांने कधी त्याला विचारले नाही, उलट त्याच्या कॉफी विथ करन सारख्या शो मधून त्याची खिल्लीच उडवली. यामध्ये सोनम कपूर, आलिया भट्ट या सगळ्यांची नावे देखील समोर आली. आणि मग असे असताना जेव्हा हे सगळे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांत प्रति आपल्या भवना (खऱ्या का खोट्या ?) व्यक्त करतात त्यावेळी त्याच्या वर प्रश्न हे उपस्थित होणारच. नेटीझन्सचं म्हणणं असं आहे कि एकीकडे तुम्ही परिवारवादाला पाठींबा देता आणि दुसरी कडे असे झाल्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवीपणा करता, त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येसाठी तुम्ही देखील जबाबदार आहात.



एकूण काय तर यामुळे मोठ मोठे अभिनेते जसे कि धर्मेंद्र जे स्वत: देखील या सिनेसृष्टीसाठी आउटसाइडर होते, किंवा रवीना टंडन किंवा रणवीर शौरी यांनी देखील नेपोटिझम विषयी भयंकर तथ्य़ मांडले आहेत. सुशांतचा मृत्यु का बरं झाला, त्यामागे काय कारण होतं, हे तर अद्याप स्पष्ट नाही मात्र सिनेसृष्टीने परिवारवादामुळे जर हा अतिशय कतृत्ववान नट गमावला असेल तर मात्र ही एक इंडस्ट्री म्हणून सिनेसृष्टीची आणि एक प्रेक्षक म्हणून आपली देखील शोकांतिका आहे.