या जोडप्याला कोरोनाने घातलेल्या धुमाकुळाची कल्पनाच नव्हती? विश्वास बसेल का?

    24-Apr-2020
|

जर आम्ही तुम्हाला सांगितले कि, एका जोडप्याला कोरोनाने जगभरात घातलेल्या धुमाकुळासंदर्भात कल्पनाच नव्हती आणि तब्बल १ महीन्यानंतर त्यांना याविषयी माहिती समजली तर यावर तुमचा विश्वास बसेल का? एलेना मेनिगेट्टी आणि रायन अजबर्न अशी या जोडप्याची नावं आहेत. तर हे दोघेही २५ दिवसांच्या समुद्र प्रवासाला निघाले. आणि त्यांनी त्यांच्या आप्तेष्टांना अधीच बजावले होते, कि कुठली ही वाईट बातमी आम्हाला सांगायची नाही. जगापासून दूर समुद्राच्या मधोमध २५ दिवस यांचा प्रवास सुरु राहिला. या काळात ते बातम्यांपासून लांब होते, त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरस ने जगभरात जो काही धुमाकूळ घातला आहे, त्याविषयी माहितीच नव्हती.


Corona_1  H x W


अटलांटिक समुद्रात या जोडप्याचा प्रवास सुरु होता. कॅरेबियन आयलंडवर पोहोचल्यावर त्यांना या महामारीविषयी समजले. एलेना एका वेबसाईटसोबत बोलताना सांगते, “जेव्हा फेब्रुवारीमध्ये आम्ही प्रवासासाठी निघालो, त्यावेळेला आम्हाला केवळ इतकेच माहीत होते कि चीन मध्ये एक कुठलातरी व्हायरस पसरला आहे. आम्हाला वाटले २५ दिवसात जेव्हा आम्ही केरेबियन आयलंडला पोहोचू तेंव्हा पर्यंत चायनात हे आटोक्यात आले असेल. मात्र चित्र काही वेगळेच होते. 


Corona_1  H x W


“आम्ही आधी फ्रेंच टेरेटोरी मध्ये आपले जहाज उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे सर्व सीमा सील केल्या होत्या. तेव्हा आम्हाला वाटले कि केवळ टूरिस्ट साठी बचाव म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र परिस्थिती इतकी गंभीर असेल याची कल्पना आम्ही केलीच नव्हती.” रायन यांनी सांगितले. 




हे जोडपं आपली पूर्ण यात्रा जीपीएसच्या माध्यमातून ट्रॅक करत असल्याकारणाने त्यांना हे सिद्ध करण्यात मदत झाली कि ते गेला एक महीना जगापासून लांब होते, त्यामुळे त्यांना बेक्विया येथे त्यांची बोट उतरवण्याची परवानगी मिळू शकली.