सातत्य शिकावं ते ‘अमिताभ बच्चन’ यांच्याकडून

    17-Apr-2020
|

माणसात अनेक गुणदोष असतात, मात्र असं म्हणतात, कि त्याच्यातील कंसिस्टंसी म्हणजे सातत्याच्या गुण त्याला खूप पुढे नेतो. हे चुकीचं ही नाही म्हणा. कारण याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपके लाडके शहंशाह अमिताभ बच्चन. आज अमिताभ बच्चन यांच्या सोशल ब्लॉगला 12 वर्षे पूर्ण झाली. आणि त्यांनी इंस्टाग्राम वर ही बातमी शेअर केली. ते लिहीतात. गेले 12 वर्षे मी सातत्याने रोज सोशल मीडियावर लिहीतो. एकही दिवस न वगळता. आज या माझ्या ब्लॉगला सुरु होऊन 4424 दिवस झाले आहेत. 4424 दिवस मी रोज लिहीले आहे.


Amitabh_1  H x


अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांची कला, अभिनय, त्यांचे गांभीर्य, त्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान, त्यांचा आवाज सगळंच घेण्यासारखं आहे, मात्र त्यांचा हा गुण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा असा गुण आहे. सातत्य आयुष्यात असेल तर मोठ मोठाले लक्ष्य सुद्धा भेदता येतात, याचे हे एक उदाहरण. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रत्येक पोस्ट पुढे एक आकडा लिहीला आहे. तो आकडा म्हणजे त्यांनी सोशल मीडियावर लिहीणे सुरु केले त्याला किती दिवस झाले हे सांगणारा आकडा होय.



अमिताभ बच्चन यांचे खूप मोठ्या संख्येत फॉलोअर्स आहेत. त्यांचे इंस्टाग्राम वर 15.4 मिलियन, ट्विटर वर 41.3 मिलियन आणि फेसबुक वर 29 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांना फॉलो करणाऱ्यांपैकी अर्ध्या लोकांनी जरी त्यांच्या या गुणाला आत्मसात केले, तरी देखील समाजात मोठा फरक पडेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.