कुत्र्याचा होतो ‘शपथविधी’ आणि त्यात तो झोपा काढतो.. आहे ना गंमतीशीर…

    16-Apr-2020
|
जर आम्ही तुम्हाला सांगितले कि एका कुत्र्याचा शपथविधी झाला, आणि त्याच्या शपथविधई सोहळ्यात तो चक्क झोपत होता, तर तुम्हाला हे खरं वाटणार नाही, हो ना? पण हे असं खरंच घडलं आहे. अमेरिकेतील ह्रोडे आयलंड इथे ही घटना घडली आहे. या कुत्र्याला पोलिस दलात सामिल करण्यात आलं, आणि तेथील परंपरेप्रमाणे त्याचा शपथविधी देखील करण्यात आला. मात्र या शपथविधी दरम्यान तो बिच्चारा आपली झोप काही आवरू शकला नाही, आणि पूर्ण कार्यक्रमाभर तो झोपलेला होता.


Sleeping Dog_1  


असं म्हणतात कुत्रा माणसाला चावला तर त्याची बातमी होत नसते, माणूस कुत्र्याला चावला कि त्याची बातमी होते. त्याच प्रमाणे ही घटना जरा जगावेगळी आहे. आणि कोरोनाच्या संकटाच्या काळात असं काहीसं मजेदार बघितलं कि मन हल्कं होतं. त्यामुळे आपण देखील हा व्हिडियो नक्कीच बघावा. 



ब्रिस्टॉल पोलिस डिपार्टमेंट येथे ही घटना घडली. “आम्ही शपथविधी साठी त्याला डेस्क वर ठेवले आणि त्याला कदाचित ते इतके आवडले कि तो लगेच झोपी गेला.” असे तेथील अधीकारी कीथ मेडीअरोस यांनी एका वेब पोर्टलला सांगितले. 



या कुत्र्याचे नाव ब्रॉडी असे आहे. आणि तो एक ‘थेरेपी डॉग’ आहे. त्याच्या तिथे असण्यामुळे कामावर असलेल्या लोकांचा ताण कमी होतो. अमेरिकते आपल्याला असे अनेक प्रकार बघायला मिळतात. अजून भारतात जरी अशा थेरेपीज सर्व ठिकाणी सुरु झालेल्या नसल्या तरी देखील ताण कमी करण्याचा हा एक अत्यंत लाभदायी उपाय आहे.