मी ब्राम्हण नाही, तरी माझ्याकडे काम आहे, याला टॅलेंट म्हणूया का?

    05-Mar-2020
|

मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे येतात, त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार देखील केला जातो, मात्र अनेकदा प्रचारादरम्यान दिलेल्या मुलाखतींमधून असे काही वक्तव्य समोर येतात, ज्यामुळे वाद निर्माण होतात. नुकतेच लोकसत्ता लाईव्हला दिलेल्या एका मुलाखतीत ‘शाळा’ आणि ‘फुंत्रु’ या सिनेमांचे दिग्दर्शक सुजय डहाके यांनी म्हटले, ‘ मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका या केवळ ब्राम्हण मुलींनाच मिळतात.’ त्यांच्या या वक्तव्यावरुन वादाची झोड उठली आहे. यावर व्यक्त होत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या इंस्टास्टोरीच्या माध्यमातून म्हटले आहे, ‘मी ब्राम्हण नाही, सीकेपी आहे बरं का, तरीही माझ्याकडे काम आहे ते ही गेली ‘य’ वर्षे, याला आपण टॅलेंट म्हणूयात का?



T pradhan_1  H

 

 


सुजय डहाके यांच्या अशा जातीयवादी वक्तव्याचा विरोध सर्वस्तरातून होत आहे. तेजश्री प्रधान ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, आणि तिला प्रमुख प्रसिद्धी ही झी मराठी वरील मालिका ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘अग्गं बाई सासू बाई’ यामुळे मिळाली आहे, त्यामुळे तिचे हे उत्तर डहाके यांच्या वक्तव्याला हाणून पाडते. 


T pradhan_1  H


तेजश्री प्रधान सोबतच त्यांचे माजी कोस्टार शशांक केतकर यांनी देखील त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून याविषयी विरोध व्यक्त केला आहे. ते लिहीतात. “दुसानिस ही माझी सह कलाकार आणि शेलार आणि गुप्ते या आडनावाच्या अभिनेत्री माझ्या आई ची भूमिका करतात ! कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे” यापुढे त्यांनी मराठी मालिका सृष्टीतील अब्राम्हण प्रमुख तारकांच्या नावाची यादी दिली आहे. 


shashank_1  H x


असे बेजवाबदार वक्तव्य केल्यामुळे डहाके वादाच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला किती महत्व द्यायचं हे प्रेक्षकांनी ठरवायला पाहीजे. कुठल्याही क्षेत्रात क्षमतेला महत्व असतं जातीला नाही हे आता सामान्य माणसाला, प्रेक्षकांना आणि कलाकारांसह दिग्दर्शकांना ही कळायला हवं. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.