भाडिपाची आई is back with आई मी आणि रंगपंचमी

    11-Mar-2020
|


Bhadipa_1  H x

 

भाडिपा आणि जगात भारी अशी भाडिपाची आई जगप्रसिद्ध आहे. आई मी आणि गणपती, आई मी आणि गेम ऑफ थ्रोन्स, आई मी आणि परीक्षा असे भाडिपाचे किती तरी एपिसोड्स आले आहेत. नुकताच भाडिपाचा ‘आई मी आणि रंगपंचमी’ असा एपीसोड आला आहे. आणि प्रेक्षकांमध्ये मात्र हशा पिकला आहे.

आपल्या सगळ्यांच्याच आया रंगपंचमीच्या दिवशी, किंवा धुळवडीच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी कशा वागतात याचं ‘जीता जागता उदाहरण’ म्हणजे हा व्हिडियो. या व्हिडियोची खासियत म्हणजे यातील संवाद. “अनी, रंग खेळायला जाताना अंडरवेअर वर प्लास्टिकची पिशवी बांधून जा, नाहीतर डाग निघत नाही.” “मर मग !! केस गळून टक्कल पडलं ना की ये मग गंगावन मागायला.” अशा अतिशय गंमतशीर संवादांमुळे हा व्हिडियो खूपच हिट झाला आहे.

 
 

एकूणच अनी, जुई आणि बबू ची तिकडी आणि त्यातून आईच्या सूचना, आईचं दिग्दर्शन, आईचं रागावणं असंच सगळं बघायला अशक्य मजा येते. होळीच्या दिवशी आई पासून जर तुम्ही लांब असाल तर हा व्हिडियो पाहून तुम्ही तिला नक्कीच फोन कराल, इतका गंमतशीर व्हिडियो आहे हा.

भाडिपाच्या आईची जय.. म्हणजे लिट्रली बरं का..