एका रानवेड्याची शोधयात्रा…

    19-Feb-2020
|

एखादे पुस्तक वाचावे अन् त्या पुस्तकाने कायम मनात घर करावे.कितीदा वाचले तरी नव्याने कळावे असे पुस्तक मी पुन्हा वाचले .खरंच सांगते त्या पुस्तकाच्या मी पुन्हा प्रेमात पडले.हे पुस्तक म्हणजे कृष्ममेघ कुंटेंनी लिहलेले"एका रानवेड्याची शोधयात्रा "हे पुस्तक होय.


book review_1  


निसर्गात रमलेल्या,चाकोरीतल्या अभ्यासक्रमात रस नसलेल्या,नापास झालेल्या मुला पासून एका संशोधकापर्यंतचा अनुभव प्रवास आहे.

 

प्राध्यापक मिलिंद वाटवे आपल्या संशोधनात मदत होईल अन् नापास झाल्या मुळे वाया गेलेले वर्ष सत्कारणी लागेल ह्या उद्देशानी कृष्णमेघला मदुमलाईच्या दाट जंगलात पाठवतात. हत्तीची लीद अन् त्यावर संशोधन हा विषय. तब्बल एक वर्ष जंगलात! वाचताना जंगलाचे सौंदर्य मोहात पाडते. तर रात्रीचे जंगल भयाण वाटते.


book review_1  

 

मदुमलाईचे दाट जंगल,हिरव्यागार वनराईत थंडी पाऊस अनुभवत उन्हाचे रूक्ष झळे.ऋतुचक्रात मिळतात.मासिनागुडी,वेगळ्या रूपात दिसलेला चंदन तस्कर वीरप्पन,रानकुत्री,हत्तींचा कळप,हत्तींचे रास्तारोको अभियान,जंगलात वाटा दाखवणारा जिवलावणारा वाटाड्या केता,कुडकोंबन हत्ती.कुडकोंबन म्हणजे ज्याचे सुळे पार सोंडेकडे वळलेले असतात असा हत्ती.सुळ्यांची तस्करी.असेच जंगल अनुभव.

हे सगळेच इतक्या सहज ,सुंदर भाषेत लिहले आहे की आपणही ह्या वेगळ्या शोधयात्रेचा एक भाग आहोत हे वाटायला लागतं.


book review_1  

 

तर,ज्यांनी पुस्तक वाचले असेल त्यांचा अनुभव माझ्या सारखाच असेल ना!अन् नसेल वाचले तर अवश्य वाचावे असे पुस्तक आहे

सौ.नीरजा बोधनकर