सॅलूनमध्ये लायब्रेरी.. कशी वाटली कल्पना?

    27-Dec-2019
|


barber_1  H x W

 
काही घटना, काही गोष्टी अशा असतात ज्या इंटरनेट वर व्हायरल झाल्याकीच लोकांपर्यंत पोहोचतात. अशीच एक इंटरेस्टिंग स्टोरी केवळ इंटरनेटमुळे अनेकांपर्यंत पोहोचली. तामिळनाडूच्या मरिअप्पन या एका न्हाव्याने आपल्या सॅलूनमध्ये लोकांना टीव्ही आणि बोघाइल बघण्यापेक्षा पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले आहे. 



ही आगळीवेगळी कथा आहे तामिळनाडूच्या थोथुकुडी या गावातील मरिअप्पनची. त्याचे स्वत:चे सॅलून आहे. या सॅलूनमध्ये जेव्हा लोक यायचे तेव्हा ते आपल्या मोबाईलमध्ये गुंग असायचे. ते नाही तर टीव्ही बघण्यात व्यस्त असायचे. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या या व्यसनाला बघून मरिअप्पन ने वेगळीच कल्पना लढवली, आणि आपल्या सॅलूनमध्ये वेगवेगळी पुस्तकं आणून ठेवली. आणि लायब्रेरी सुरु केली. यामुळे लोकांना पुस्तकं वाचण्याची गोड लागेल आणि सोशल मीडियाचे व्यसन कमी होईल, हा त्या मागचा विचार होता.

मरिअप्पनने लोकांना याकडे आकर्षित करण्यासाठी ‘जो कोणी पुस्तक वाचेल, त्याला ३०% सूट देण्याचा निर्णय़” घेतला. त्याच्या या वेगळ्या विचारामुळे त्याच्या सॅलूनमध्ये येणाऱ्या लोकांना पुस्तकांप्रती आकर्षण निर्माण झालं, आणि त्यामुळे त्याच्या सॅलूनमध्ये अधिकाधिक लोकं यायला लागली. यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे, तसेच वेगळ्यापद्धतीने एका चांगल्या विचाराने देखील व्यवसाय करता येऊ शकतं, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.  आहे ना अतिशय प्रेरणास्पद बाब?