कपिल्स सॅलून एण्ड अकॅडमी आता पुण्यातही

    21-Dec-2019
|



Kapil_1  H x W:


देशातील ,सगळ्यात मोठी सेलेब्रिटी युनिसेक्स सॅलून चेन आता आपल्या पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट येथे हजर


पुणे : आपल्या रोजच्या हेक्टिक आयुष्यात आपल्याला देखील राजेशाही ग्रूमिंगची गरज ही असतेच. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे कि, देशातील प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठी सेलिब्रिटी सॅलून चेन कपिल्स सॅलून एण्ड अॅकेडमी आता पुण्यातही आली आहे. पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट येथे नुकतेच या सॅलून चेनचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. 

या सॅलूनमध्ये संपूर्ण सौंदर्य थेरेपी आणि हेअरड्रेसिंग सर्व्हिस देण्यात येणार आहे. देशभरात या सेलिब्रिटी सॅलूनच्या २१ शाखा आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अहमदाबाद, हिम्मतनगर, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू येथे अत्याधुनिक सेवा सुविधांच्या माध्यमातून ते विविध भागात ग्राहकांना सेवा देत आहेत, आणि आता पुणेकरांना देखील या सॅलूनच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.


ग्राहकांना अतिथी मानत येथे अतिशय उत्तम सुविधा देण्यात येतात आणि एक अविस्मरणीय अनुभव घेऊन हे अतिथी आपल्या घरी जातात, येथे स्वच्छतेविषयी कुठलीही तडजोड करण्यात येत नाही. उत्कृष्ट मनुष्यबळ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी भरती करण्यात त्यांचा विश्वास आहे. कपिल यानी सांगतले, "आमच्या पाहुण्यांना राजेशाही वागवले जाते, आम्ही एखाद्या राजा / राणीची सेवा करू अशा प्रकारे आम्ही त्यांची काळजी घेतो." उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशील, ते त्यांच्या पाहुण्यांना अतिशय आपुलकीने वागविण्यावर विश्वास ठेवतात

कपिल्स सॅलून एक luxurious आणि राजेशाही अनुभव देतं. केवळ ग्राहकांसाठीच नाही तर ते स्वत: च्या व्यावसायिकांकडेही तितकेच विशेष लक्ष देतात.

कपिल शर्मा स्वतः अनेकांसाठी एक प्रेरणा आहेत, त्याला जनतेचं भरपूर प्रेम मिळाले आहे आणि त्यांनी 3 वेळा कस्टमर चॉईस अवॉर्ड जिंकून हे सिद्ध केले की गुणवत्ता आणि स्वच्छता हे त्यांच्या या सॅलून चेनचे यूएसपी आहे.. ही आलिशान आणि नाविन्यपूर्ण सलून साखळी त्याचे एक उदाहरण आहे!



Kapil_1  H x W: 
 
कपिल्स सॅलून अँण्ड अकॅडमीचे संस्थापक आणि क्रियेटिव्ह डायरेक्टर कपिल शर्मा यांच्या मुंबई येथे तीन अकॅडमीज आहेत. त्याशिवाय त्यांच्या अनेक सॅलून चेन प्रसिद्ध आहेत. ज्याचे प्रमुख उद्येश्य स्किल डेव्हलेपमेंट म्हणजेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून हेअर, ब्यूटी, मेकअप, नेल, टॅटू आणि सॅलून मॅनेजमेंटच्या क्षेत्रात अधिकाधिक लोकांना सबळीकरण आणि शिक्षण देणे आहे.

कपिल जेव्हा या ‘स्वप्ननगरीत’ पहिल्यांदा आले तेव्हा त्यांच्या खिशात केवळ ७०० रुपये होते. त्यांनी या सेलिब्रिटी सॅलून चेनच्या पहिल्या शाखेची स्थापना २००७ मध्ये मुंबई आणि गुरुग्राम येथे केली. २० हून अधिक वर्षांच्या मोठ्या अनुभवानंतर कपिल शर्मा आज स्वत: १४० हून अधिक हेअर कट्स एका दिवसात देऊ शकतात. लेरिअॅल या प्रसिद्ध ब्रँडच्या नवीन रेंजचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कपिल यांची निवड करण्यात आली आहे, या सोबतच त्यांनी ब्यूटी आणि फॅशन इंडस्ट्री मध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ते एक प्रसिद्ध मोटीव्हेशनल स्पीकर देखील आहेत आणि त्यांनी या विषयावर जगभरात अनेक कार्यशाळा देखील आयोजित केल्या आहेत. फेमिना मिस इंडिया मध्ये अनेकांना स्टाईल करणारे ते देशातील प्रसिद्ध स्टाइल डिरेक्टर आहेत.


सौंदर्य आणि फॅशन जगातील सर्वात विश्वासार्ह व्यावसायिकांनी सलूनमध्ये स्वतःचे लाड करुन घेण्यापेक्षा चांगले काय असेल.