अखेर फिरोदिया करंडक संयोजन समितीने निर्णय घेतला मागे..

    13-Dec-2019
|


Firodiya_1  H x 

 

काल फिरोदिया करंडकाच्या फॉरमॅट मध्ये झालेल्या बदलानंतर जनतेच्या तिखट प्रतिसादामुळे अखेर आज फिरोदिया करंडकाच्या निर्णायक समितीने आपला निर्णय मागे घेतला आहे. आज आयोजन समितीने निवेदन प्रसिद्ध करत सांगितले आहे की, “मुलांनी जात धर्माच्या पलिकडे जाऊन काहीतरी नाविन्य पूर्ण करावे, जाती-धर्मांमुळे तेढ निर्माण होईल असे विषय न घेत वेगळ्या विषयांवर मांडणी करावी असा आमचा हेतू होता, मात्र त्याचा खूप चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. फिरोदिया करंडक संयोजन समिती कधीच अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा येईल असा निर्णय घेणार नाही, त्यामुळे सर्व बाबींचा विचार करत आम्ही हे सर्व निर्बंध त्वरित मागे घेत आहोत.” असे त्यांनी या निवेदनातून जाहीर केले आहे. 
 
 
तसेच “विषयांची तीव्रता लक्षात घेता आता या पुढे, प्रयोग सादर करण्याआधी नियमांनुसार संघांनी नाटकाच्या स्क्रिप्ट बाबत सेंसॉर मंडळाची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांना प्रयोगासाठी परवानगी दिली जाईल. याबबातची कुठलीही जबाबदारी संयोजन समितीची नसेल.” असे देखील या निवेदनात जाहीर करण्यात आले आहे. 
एकूणच कालची जनतेची विशेषत: विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेता, संयोजन समितीने हा निर्णय मागे घेतला असल्याचे दिसून येत आहे. कालच्या Fikarnot.online च्या या संदर्भातील व्हिडियोवर देखील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. 
या निवेदनाच्या निमित्ताने संयोजन समितीने फिरोदिया करंडकर विविध गुण दर्शन स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.