तरुणांनो जागे व्हा.. पुढे या आणि मतदान करा !!

    21-Oct-2019



 
 
आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींसाठी मतदान आहे. आणि एक तरुण म्हणून आपण सगळ्यांचेच हे कर्तव्य आहे की एक चांगले सरकार निवडण्यासाठी, आपले भविष्य निवडण्यासाठी मतदान करण्याचे. आजच्या दिवशी आपण सगळ्यांना आपला हा हक्क बजावला पाहीजे आणि मतदान करुन महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले देखील योगदान दिले पाहीजे. 

आता पर्यंत महाराष्ट्रात केवळ ३२ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचे प्रतिशत वाढले तरच चांगले सरकार निवडण्यास मदत होईल. आपण आपले भविष्य निवडतोय त्यामुळे आपण पूर्ण विचार करून मतदान करायला पाहिजे. 
 

 
 

मतदान कुणाला करतोय हे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्वाचे ‘मतदान करणे’ आहे. कारण जो पर्यंत आपण मतदानासाठी पुढे येत नाही तोवर आपण कुणाला मत द्यायचे याबद्दल बोलूच शकत नाही. नंतर नावं ठेवणं, चुका काढणं सोप्प असतं, त्यामुळे आधीच मतदान करा आणि आपले कर्तव्य पार पाडा. 

आपल्या सर्व रोल मॉडेल्स मग ते सिने जगतातील अभिनेते मंडळी असू देत नाही तर सचिन तेंडुलकर, महेश भूपती असू देत, राजकीय नेते असू देत नाहीतर कलावंत सर्वांनीच आपापल्या सोशल मीडिया वरुन मतदान केल्याचे पोस्ट्स शेअर केले आहेत. तुम्ही देखील मतदान करा, आपला फोटो पोस्ट करा आणि आम्हाला टॅग करा. चला सगळ्यांनी मिळून मतदानाप्रती जागरुकता पसरवण्यात मदत करावी. 

तरुणांनो जागे व्हा.. मतदान करा.. आपला हक्क बजवा… आपले भविष्य निवडा…